Home /News /entertainment /

'राजा राणीची गं..' फेम अभिनेत्री नव्या भूमिकेत; नवीन प्रेमकथा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'राजा राणीची गं..' फेम अभिनेत्री नव्या भूमिकेत; नवीन प्रेमकथा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) ‘मन झालं बाजिंद’ (Mann Zal Bajind) ही नवी मालिका घेऊन येत आहे.

  मुंबई 28 जुलै : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर लवकरच काही मालिका संपून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘ती परत आलीये’ मालिकेचा प्रोमो आला होता. तर आता आणखी एका मालिकेचा प्रोमो आला आहे. ‘मन झालं बाजिंद’ (Mann Zal Bajind) असं या मालिकेचं नाव आहे. अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) आणि अभिनेता वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एक प्रेमकहाणी ही नवी मालिका असल्याचं दिसतं आहे. नुकताच झी मराठी वाहिनीने मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे.
  श्वेता याआधी ‘राजा राणी ची ग जोडी’ या कलर्स मराठी वाहिनी वरील मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. तर आधीही तिने अनेक मालिकांमध्ये लहान भूमिका साकारल्या होत्या. तर मन झालं बाजिंद या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनयासोबतच ती उत्तम डान्सरही आहे. सोशल मीडिया वर तिचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.

  खूपच रंजक आहे धनुष-ऐश्वर्याची Love Story! असं झालं रजनीकांत यांच्या मुलीशी लग्न

  अभिनेता नितीश चव्हाण सोबत (Nitish Chavan) तिची डान्स केमिस्ट्री मागील काही दिवसांपासून चांगलीच हीट ठरत आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जातं. या नव्या मालिकेतून श्वेता प्रेक्षकांना भेटायला उत्सुक आहे. ‘राजा राणी ची ग जोडी’ मालिकेत तिचं मोनिका हे पात्र हीट ठरलं होतं. त्यातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. वाघोबा प्रॉडक्शन्स या मालिकेची निर्मिती करत आहेत. याआधी कारभारी लयभारी ही मालिका या प्रोडक्शनची सुरू आहे. अद्याप मालिकेची वेळ सांगण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्या मालिकेच्या जागेवर ही मालिका दिसणार हे स्पष्ट झालं नाही. दरम्यान ‘अग्गबाई सूनबाई’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण आणखी कोणती मालिका निरोप घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या