मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'अप्पी आमची कलेक्टर'; झी मराठीवर नवी मालिका येणार भेटीस, पाहा VIDEO

'अप्पी आमची कलेक्टर'; झी मराठीवर नवी मालिका येणार भेटीस, पाहा VIDEO

'झी मराठी' वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव 'आप्पी आमची कलेक्टर' (AppAmchi Collector) आहे. पाहा व्हिडीओ

  मुंबई, 31 जुलै: मराठी मालिकांचा प्रेक्षक वर्ग वाढत चालल्याचा दिसत आहे. वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळत अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत असतात. अशातच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणखी एक मराठी मालिका सज्ज झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या मालिकेची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.  'झी मराठी' वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव 'आप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) आहे.  ही मालिका लवकरच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी द्यायला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पहायला मिळतोय. ही मालिका 22 ऑगस्टपासून संध्याकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. हेही वाचा -  Shreya Bugde: 'सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?', श्रेया बुगडेची पोस्ट पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांच्या वज्र प्प्रॉडक्शन निर्मित ही मालिका आहे. काही दिवसांपूर्वी निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदेने आपल्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. 'आप्पी आमची कलेक्टर' असं या मालिकेचं नाव आहे.
  दरम्यान, मालिकेच्या प्रोमोमधीन पहायला मिळतंय की, अपर्णा सुरेश माने नावाची मुलगी लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कलेक्टर झाली आहे. त्यामुळे या नव्या मलिकेची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या