रिलीज झालेल्या प्रोमोत देशपांडे सर देवाला जाब विचारताना दिसत आहेत. ते म्हणतात, 'आज तु माझ्या दीपूला मराणाच्या दारात उभं केलं आहे. बाप जिवंत असताना त्याची मुलगी मरणाच्या दारात उभी आहे. जिवंतपणी तरी कोणत्याही बापाला हा दिवस दाखवू नकोस. ही कसली शिक्षा देतोस तू, हा कसला छळ मांडला आहेस तु. तुला जीव हवा आहे का माझा. घे माझा जीव घे. माझ्या दीपूला काय झालं तर याद राख, माझ्या मुलीसाठी मी माझा जीव आनंदानं द्यायला तयार आहे. आजवर तुझ्याकडे मी काही मागितल नाही पण आता भिक मागतोय'. भावूक झालेल्या देशपांडे सरांना पाहून प्रेक्षकांची मनं ही भरुन आली आहेत. दीपूच्या अपघाताने मालिका आता नवं वळण घेत आहे एकीकडे अजिंक्य तर दुसरीकडे देशपांडे कुटुंबाची दीपूला वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड मालिकेतून पुढच्या भागांची उत्सुकता वाढवत आहे. देशपांडे सरांची लाडकी दीपू आणि इंद्राचींची दीपिका मॅडम बरी होणार का? सानिकाने केलेली चुक दीपूच्या जिवावर बेतणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगमी भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial