Home /News /entertainment /

इंद्रा आहे जयश्रीचा दत्तक मुलगा? मालिकेत नव्या पात्राची एंट्री; पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

इंद्रा आहे जयश्रीचा दत्तक मुलगा? मालिकेत नव्या पात्राची एंट्री; पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

इंद्रा आहे जयश्रीचा दत्तक मुलगा? मालिकेत नव्या पात्राची एंट्री; पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

इंद्रा आहे जयश्रीचा दत्तक मुलगा? मालिकेत नव्या पात्राची एंट्री; पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

मन उडू उडू झालं मालिकेत छोट्या इंद्राची एंट्री होणार आहे. इंद्राच्या बालपणीची कहाणी आपल्याला मालिकेच्या येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

  मुंबई, 24 जून: मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Jhal) मालिकेत सध्या इंद्रा दीपूच्या ( Indra-Deepu) प्रेमाची परीक्षा सुरू आहे. इंद्रा करत असलेलं काम सगळ्यांसमोर आल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दीपू आणि इंद्राचं लग्न देखील देशपांडे सरांनी मोडलं. तर दुसरीकडे जयश्रीला देखील इंद्राच्या गुंड असल्याचं सत्य समोर आल्यानंतर प्रचंड त्रास झाला आहे. यासगळ्यात मात्र दीपूनं घरच्यांच्या विरोधात जाऊन इंद्राची साथ देण्याचं वचन त्याला दिलं आहे. इंद्राला त्याच्या वागण्याचा खूप त्रास झाल्यानं तो साळगावकरांच्या घरी देखील गेलेला नाही. स्वत: आधी कायम इतरांचा विचार करणाऱ्या इंद्रावर आज घराबाहेर राहण्याची वेळ आली. त्याचा हा संघर्ष आजचाच नाही तर लहानपणापासूनचा आहे. इंद्राच्या बालपणीचा प्रवास आपल्याला मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे. इंद्राच्या बालपणीचा संपूर्ण प्रवास येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका वेबसाईटनं मोठ्या आणि छोट्या इंद्राचा फोटो शेअर  केला आहे. ज्यात छोटा इंद्रा शाळेचा गणवेशात दिसत आहे. डॅशिंग,बिनधास्त पण तितकाच प्रेमळ इंद्रा बालपणी कसा होता हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. इंद्राचं बालपण नक्की कसं होतं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
  आपण पाहिलं तर  इंद्राच्या वडिलांचं छत्र बालपणीच हरवलं. त्यामुळे जयश्रीनं तिन्ही मुलांना एकटीनं सांभाळलं. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: संजनामुळे होणार अनघाचा अपघात! अनिरुद्ध सुनावणार खडे बोल वडिलांचं छत्र हरवल्यानं इंद्रा फार लवकर मोठा झाला आणि त्यानं संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली. पण इंद्राच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला हे आता या मालिकेच्या या विशेष भागातून प्रेक्षकांना कळणार आहे. छोट्या इंद्राच्या एंट्रीनंतर चाहत्यांनी बरेच अंदाज वर्तवले आहेत. इंद्रा हा जयश्रीचा दत्तक घेतलेला मुलगा आहे, असं म्हटलं जात आहे. इंद्राच्या आयुष्यात बालपणी नक्की काय झालं? याचं उत्तर मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे. मन उडू उडू झालं मालिकेत मागील 2 महिन्यांपासून वेगवेगळे ट्विस्ट आणले जात आहेत. मात्र तरीही मालिका टिआरपीच्या शर्यतीत मागे पडत आहे. या आठवड्यात तर मालिका टिआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, TV serials, Zee marathi serial

  पुढील बातम्या