Home /News /entertainment /

'रोज साडेसातला रडारड सुरू होते', इंद्रा दीपूचा करंट ट्रॅक प्रेक्षकांच्या डोक्याला झाला ताप

'रोज साडेसातला रडारड सुरू होते', इंद्रा दीपूचा करंट ट्रॅक प्रेक्षकांच्या डोक्याला झाला ताप

zee marathi man udu udu jhal

zee marathi man udu udu jhal

मागच्या काही दिवसांपासून मन उडू उडू झालं मालिकेत केवळ आणि केवळ इमोशन सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. इंद्रा दीपूचा हा करंट ट्रॅक प्रेक्षकांच्या डोक्याचा मात्र ताप झाला आहे.

  मुंबई, 28 जून: झी मराठीवरील ( Zee Marathi) मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Jhal) मालिकेत सध्या प्रचंड इमोशनल ट्रॅक सुरू आहे. इंद्रा ( Indra) घरातून बाहेर गेल्यानं त्याची हालत पाहावेनशी झालीय. तर दुसरीकडे दीपूने ( Deepu) देखील देशपांडे सरांशी घेतलेल्या वाईटपणामुळे सगळेच नाराज आहेत. इंद्रा आणि दीपूला सत्तूची साथ मिळाली आहे पण तरीही दोघे सतत रडताना दिसतात. मागच्या काही दिवसांपासून मालिका सुरू झाल्यानंतर केवळ आणि केवळ इमोशनल सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. इंद्रा दीपूचा हा करंट ट्रॅक प्रेक्षकांच्या डोक्याचा मात्र ताप झाला आहे.  सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल करत कमेंट्स केल्या आहेत. मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की, दीपू दुरावलेल्या आई मुलाला एकत्र आणणार आहे. काही दिवसांपासून इंद्रा घरापासून लांब आणि जयश्रीपासून दूर गेला आहे. दोघांनाही एकमेकांची प्रचंड आठवण येत आहे. त्यामुळे दीपू येत्या इंद्रा आणि जयश्री यांची भेट घालून देणार आहे. दीपू साळगावकरांच्या घरी जाते आणि जयश्रीला इंद्राकडे घेऊन येते. जयश्री स्वत:च्या हातानं बनवलेलं जेवण इंद्राला खावू घातले. यावेळी माय लेकाचा अत्यंत भावूक क्षण दाखवण्यात येणार आहे. मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या डोक्याची मात्र तार सटकल्याचं पाहायला मिळत आहे. हेही वाचा - VIDEO: 'फुलावर फिरत असतो भुंगा...', पाठक बाईंनी राणा दा साठी घेतला भन्नाट उखाणा
  मन उडू उडू झालं मालिकेच्या मागच्या काही दिवसांपासूनच्या भागांवर नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल केलंय. एका युझरनं म्हटलंय, 'असं म्हणतात की संध्याकाळी रडू नये कारण घरात लक्ष्मी येते पण रोज साडेसात ला हे रडारड सुरू करतात! डोक्याला ताप!', तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय, 'पाणी ओता रे संघटनेचा अवार्ड या मालिकेला देण्यात येत आहे' तर काही चाहत्यांनी मालिकेतील इंद्राच्या भूमिकेचं कौतुकही केलं आहे. चाहत्यांनी म्हटलंय, 'इंद्रा देतो गुडांना फटका एका बुक्कीत गार करतो सर्वांचा खटका. इंद्रा ला जर कोणी नडला त्याला एका बुक्कीत आडवा पाडला',  'इंद्रा म्हणजे इंद्राच नाही, इंद्रा सर्वांचा डॅशिंग हिरो हाय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या