तर दुसरीकडे सानिका 'मी दीपूला घराचा उंबरा ओलांडू देणार नसल्याची', भाषा करत आहे. पण यावेळी मात्र सानिकाचा सगळा उन्मात जयश्री खोडून काढणार आहे. 'तुझी इच्छा असो वा नसो दीपू या घरात मोठी सून म्हणून आणि तुझी मोठी जाऊ म्हणून येणार म्हणजे येणार', अशा शब्दांत जयश्री सानिकाला उत्तर देणार आहे. हेही वाचा - राज ठाकरेंच्या वाढदिवसाला केदार शिंदेंची दोन शब्दाची पोस्ट ठरतेय लक्षवेधी, काय आहे त्यात खास? अखेर दीपू इंद्राची बायको आणि साळगावकरांची मोठी सून म्हणून येणार असल्यानं सानिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. दीपू आपली लहान बहिण असून तिला सासरी मोठ्या सूनेचा मान मिळणार असल्याचं सानिकाला सहन झालेलं नाही. मोठ्या अपघाततून बाहेर आलेल्या दीपूच्या विरोधात नवी खेळी खेळण्यासाठी सानिका सज्ज झाली आहे. इंद्रा दीपूच्या प्रेमात सानिका मीठाचा खडा टाकणार आहे. दीपूला त्रास देण्यासाठी सानिका कार्तिक मिळून कोणता प्लान आखणार आणि मालिकेत कोणतं नवं वळण येणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. मन उडू उडू झालं मालिकेत आलेल्या नव्या स्टोरीमुळे मालिका आता टिआरपीच्या खेळात पुढे सरकणार का याकडेही सर्वांच लक्ष आहे. मधल्या काळात दीपू मालिकेतून गायब झाल्यानं प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ केली होती. आता दीपूच्या एंट्रीनं प्रेक्षक पुन्हा मालिकेला पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial