सिम्मीची फजिती पाहून व्हिडीओचा कमेंट सेक्शनवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युझरनं भन्नाट कमेंट करत म्हटलंय, 'अरे सिम्मीची तर भुतनी बनवली'. तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय, 'लग्नातही सिम्मीचा असाच मेकअप ठेवा'. तर अनेकांनी सिम्मीच्या भूमिकेचं तोंडभरुन कौतुकही केलं आहे. हेही वाचा - परीनं घेतला पहिल्या पावसाचा आनंद; रेन डान्सचा झक्कास VIDEO व्हायरल नेटकऱ्यांनी तर सिम्मीच्या हळदीतील फजितीवर मिम्सही तयार केलेत. पाहा सिम्मीचा हा भन्नाट मिम.View this post on Instagram
यश आणि नेहाच्या लग्नातील हे खास व्हिडीओ त्यांच लग्न आणखी खास करणार आहेत. दोघांचा शाही विवाहसोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकही जरा जास्तच उत्साही असल्याचं दिसत आहे. लग्नात प्रेक्षकांना एकाहून एक सुंदर सरप्राइज मिळणार आहेत. छोटी परी आईसाठी खास गाणं गाणार आहे. तर नेहा यशची लग्नातली एंट्रीही काहीशी खास असणार आहे. त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठचा रविवारचा विवाह सोहळ्याचा दोन तासांचा विशेष भाग पाहायला विसरू नका.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial