Home /News /entertainment /

'जगणं हे न्यारं झालं जी'; ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधे यश नेहा सोबत घालवणार सुंदर क्षण, पाहा VIDEO

'जगणं हे न्यारं झालं जी'; ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधे यश नेहा सोबत घालवणार सुंदर क्षण, पाहा VIDEO

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर यश आणि नेहाचा रोमॅन्टिंग अंदाजतला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही सुंदर क्षण सोबत घालवताना दिसत आहे.

  मुंबई, 6 ऑगस्ट : झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील पात्र नेहा, यश आणि परी तिघेही मालिकेचे मुख्य आकर्षण आहे. तिघांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरतात. अशातच मालिकेत सध्या मंगळागौरचा सण साजरा करण्यात येणार आहे. नेहाचा हा पहिलाच मोठा सण असणार आहे. त्यामुळे हा खासच असणार आहे यात काही शंकाच नाही. या मालिकेतील आगामी भागातील यश आणि नेहाचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर यश आणि नेहाचा रोमॅन्टिंग अंदाजतला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही सुंदर क्षण सोबत घालवताना दिसत आहे. त्यांचे हे सुंदर क्षण आपल्याला पुढच्या भागात पहायला मिळणार आहे. दोघंही 'जगणं हे न्यारं झालं जी' या सुंदर गाण्यावर डान्स करतायेत. त्यांचा हा छोटासा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यश-नेहाचा हा अंदाज चाहत्यांनाही त्यांच्या प्रेमात पाडत आहे.
  श्रावण महिना सुरु झाला असून सगळीकडे मंगळागौरीचा खेळ सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेकजण हा सण अगदी धुमधडाक्यात साजरा करतात. मराठी मालिकांमध्येही या सणाचं खूप महत्त्व दाखवलं जातं. अनेक निरनिराळे खेळ यानिमित्तानं घेतले जातात. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्येही मंगळागौर अगदी जोरदार पद्धतीनं पहायला मिळणार आहे. याच्या तयारीचेही भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पहायला मिळत आहे. हेही वाचा -  'चौकातला गजर, पाऊस, पाय रंगवून टाकणारी रांगोळी'; तेजस बर्वेची लक्ष्मी रोडविषयी मार्मिक पोस्ट मालिकेच्या आगामी भागाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात नेहा, सिम्मी काकू, नेहाची मैत्रीण सगळ्या जणी मस्त नटल्यात. सुंदर साड्या, दागिने घालून पुढच्या शॉटला तयार झाल्यात. परीच्या मराठमोळ्या साजनं तर सगळ्यांनाच मोहून टाकलं आहे. त्यामुळे  ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील मंगळागौर पाहण्यासाठी उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या