Home /News /entertainment /

आईच्या लग्नात लेक करवली! नेहाच्या लग्नात परी लावणार ठुमके, नवं गाणं लवकरचं भेटीला

आईच्या लग्नात लेक करवली! नेहाच्या लग्नात परी लावणार ठुमके, नवं गाणं लवकरचं भेटीला

आईच्या लग्नात लेक करवली! नेहाच्या लग्नात परी लावणार ठुमके, नवं गाणं लवकरचं भेटीला

आईच्या लग्नात लेक करवली! नेहाच्या लग्नात परी लावणार ठुमके, नवं गाणं लवकरचं भेटीला

यश आणि नेहाच्या ( neyash Wedding) लग्नात परी सगळी हौस पूर्ण करणार आहे. लग्नात नेहासाठी परी खास गाणं सादर करणार आहे. पाहा मालिकेतील नव्या गाण्याची खास झलक

  मुंबई, 09 जून:   माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत नेहा आणि यश (Neha Yash Wedding)  यांच्या शाही लग्नाचा विशेष भाग रविवारी12 जूनला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  गेली अनेक दिवस प्रेक्षक ज्याती वाट पाहत होत तो नेहा आणि यश यांचा लग्न सोहळा अखेर पार पडणार आहे. 2 तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना शाही विवाहसोहळा पाहायला मिळणार आहेच पण प्रेक्षकांसाठी खास सप्राइजही असणार आहे. मालिकेत यश नेहाचा साखरपुडा झालाय. हळदही होणार आहे आता बास्स लग्नाची तयारी बाकी आहे. दोघांच्या घरी लगीन घाई सुरू आहे. छोट्या परीनं (Pari)  देखील कंबर कसून आईच्या लग्नाची तयारी केली आहे. लग्नातही परी आईला गोड सप्राइज देणार आहे. (Majhi Tujhi Reshimgath New Song)  नेहासाठी खास गाणं परी सादर करणार आहे. आईची करवली म्हणून मिरवण्याचा मान परीला मिळाल्यानं परीचं गोड गाणं मालिकेत प्रदर्शित होणार आहे. गाण्याचा छोटा प्रोमो झी मराठीनं त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. नेहा यश यांच्या लग्नातील खास गाण्यात छोटी परी दणकून नाचनाता दिसणार आहे. गाण्याच्या प्रोमोमध्ये परी आनंदानं मंडपातून पळताना दिसतेय. तर दुसरीकडे संपूर्ण चौधरी कुटुंब यशच्या लग्नाच्या वरातीत नाचनाता दिसत आहेत.  त्याचप्रमाणे नेहाचे फार गोड, सुंदर सिनेमॅटीक शॉर्टही गाण्यात दिसणार आहेत. मुख्य म्हणजे, छोटी परी ठुमके देत नाचताना दिसणार आहे.
  'करवल्या नटल्या गं, मांडव दार सजला हो... नवरदेव वेशीवर हो, नवरीबाय हसते गं...!' अशा गाण्याच्या पहिल्या काही ओळी आहेत. या ओळी ऐकून गाणं थोड इमोशनल असेल असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. नेहा आणि परी यांच्यातली हळवी बाजू गाण्यातून दाखवण्यात येणार आहे असंही म्हटलं जात आहे.  आता हे गाणं 12 जूनच्या दोन तासांच्या विशेष भागात बघायला मिळणार आहे. हेही वाचा - समीरवर चढणार यश नेहाच्या हळदीच्या रंग; दारुच्या नशेत शेफालीला करणार प्रपोज गाण्याचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संपूर्ण गाणं पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.  #neyash असा हॅशटॅग वापरुन कमेंट्सचा वर्षाव केलाय. प्रोमोतला नेहाचा खळखळून हसणारा शॉर्ट पाहून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत. यश आणि नेहा यांच्या लग्नामुळे सध्या मालिका विश्वात यांचीच चर्चा आहे. झी मराठीवरील तुला पाहते रे मालिकेच्या वेळी झालेली चर्चा यश-नेहाच्या लग्नातही पाहायला मिळत आहे. सिल्वासा येथे मालिकेतील लग्नाचं हे खास शुटींग करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील कलाकारांचे लूक पाहून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या