हेही वाचा - AAI KUTHE KAY KARTE मालिकेत होणार नव्या पात्रांची एंट्री; येत्या भागात पाहायला मिळणार कलाकारांची धम्माल व्हिडीओखाली कमेंट्स करत नेटकऱ्यांनी म्हटलंय, 'प्रेम दाखवायला तुम्हाला मराठी गाणी मिळत नाहीत का?', एका युझर्सनं सगळ्या मालिकांना निशाण्यावर घेत, 'सगळ्या मालिकांमध्ये हिंदी गाणीच का असतात तुम्हाला मराठी गाणी मिळत नाहीत का?', असं म्हटलं आहे. तर अनेकांनी यश नेहाचा व्हिडीओ प्रचंड आवडला असून अनेकांनी कमेंट करत 'आता परीचा छोटा भाऊ बहिण येणार का?', असं म्हटलंय. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सगळं काही सुरळीत सुरू असताना मिठाचा खडा टाकत नेहाच्या पहिल्याची नवऱ्याची एंट्री होणार आहे. यश नेहाच्या लग्नाची बातमी कळल्यानंतर तो तिला शोधत तिच्या घरापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे यश नेहाची जुळलेली रेशीमगाठ लवकरच तुटणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. त्यामुळे मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial