Home /News /entertainment /

नायिकांनी घेतली लग्नासाठी सुट्टी, अन् मालिकांच्या TRPची झाली घसरगुंडी

नायिकांनी घेतली लग्नासाठी सुट्टी, अन् मालिकांच्या TRPची झाली घसरगुंडी

नायिकांनी घेतली लग्नासाठी सुट्टी, अन् मालिकांच्या TRPची झाली घसरगुंडी

नायिकांनी घेतली लग्नासाठी सुट्टी, अन् मालिकांच्या TRPची झाली घसरगुंडी

उत्तम कलाकार, सुंदर कथा असलेल्या मालिका नेहमीच प्रेक्षकांना आवडतात आणि टीआरपीच्या खेळातही बाजी मारतात. परंतू झी मराठीवरील काही मालिका यात मागे पडल्याचं दिसून आलं आहे. मालिकेतील मुख्य नायिकांनीच सुट्टी घेतल्यानं मालिकांनी टिआरपीच्या खेळातही मार खाल्ला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 02 जून:  छोट्या पडद्यावर सध्या एकाहून एक हिट मालिका प्रेक्षकांच्या पाहायला मिळत आहेत. त्यातही सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) 'रंग माझा वेगळा' (Rang Majha Vegla) या मालिकांचा समावेश आहे. मालिकेतील कथानक जसं पुढे सरकतं तसं प्रेक्षकांची मालिका पाहण्याची उत्सुकता वाढते.  उत्तम कलाकार, सुंदर कथा असलेल्या मालिका नेहमीच प्रेक्षकांना आवडतात आणि टीआरपीच्या खेळातही बाजी मारतात. परंतू काही मालिकांची कथा सुंदर असूनही मालिका टिआरपीच्या खेळात मात्र मार खातात. सध्या अशीच अवस्था झालीय झी मराठी (Zee Marathi)वरील काही मालिकांची. झी मराठीवर सध्या 'मन मन उडू झालं' (Man Udu Udu Jhala) आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिका सर्वाधिक पाहिल्या जात आहेत. परंतू टिआरपी रेटिंगमध्ये दोन्ही मालिक तोंडघशी पडल्या आहेत. मालिकेची खरी ओळख असेत ती म्हणजे मालिकेच्या मुख्य नायिका. मध्यंतरी दोन्ही मालिकांच्या नायिकांनी मालिकेतून काही दिवसांची सुट्टी घेतली. नायिकाचा गायब झाल्यानं प्रेक्षकांनी मालिका पाहणे सोडले अशा प्रतिक्रिया समोर येत आहे. याचाच फटका मालिकेच्या टिआरपीला बसल्याचं म्हटलं जात आहे. 'माझी तुझी रेशीमगाठी' ही मालिका सध्या 4.7 टिआरपी रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे. तर 'मन उडू उडू झालं' ही मालिका 3.1 सर्वात कमी रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेतील 'दीपू' मागच्या काही एपिसोडमध्ये कोमात गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात मात्र दीपू म्हणजेच अभिनेत्री 'हृता दुर्गुळे' (Hruta Durgule Wedding) हिने तिच्या लग्नासाठी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. ह्रता मालिकेत नसल्याचा चांगलाच फटका मालिकेला बसल्याचं म्हटलं जात आहे. हृता आता भारतात परतली असून तिनं शुटींगला सुरुवात केली. मालिकेत दीपू परत आल्याने पुढील आठवड्यात मालिका पहिल्या पाचात असेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  हेही वाचा - TOP 10 Marathi Serial in Week: कार्तिकी विचारणार दीपाला जाब! 'रंग माझा वेगळा' नव्या वळणासह TRPत नंबर वन असाच प्रकार काही दिवसांपूर्वी 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेबाबत झाला होता. मालिकेतून नेहा काही दिवसांसाठी कंपनीच्या कामानिमित्त परदेशात गेल्याच दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र नेहा म्हणजेच अभिनेत्री 'प्रार्थना बेहरे' (Prathna Behre) काही दिवसांची सुट्टी घेऊन मैत्रिणीच्या लग्नासाठी लंडनला गेली होती. प्रार्थना मालिकेत परत आल्यानंतर मालिका पुन्हा रुळावर आली. सध्या माझी तुझी रेशमीगाठ मालिकेत यश नेहाचं लग्न दाखवण्यात येणार आहे. सिल्वाला येथे दोघांच्या लग्नाचं शुटींग सुरू आहे. 'तुला पाहते रे' (Tula Pahte Re) या मालिकेप्रमाणेचं नेहा आणि यशचा भव्य लग्नसोहळा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका पुढील आठवड्यात टॉप 3मध्ये असण्याची शक्यता आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या