Home /News /entertainment /

VIDEO: महामिनिस्टरच्या नागपूर केंद्रावर वहिंनीचें चौकार षट्कार, भन्नाट उखाणे ऐकून नवरे वर्गाची पडणार विकेट

VIDEO: महामिनिस्टरच्या नागपूर केंद्रावर वहिंनीचें चौकार षट्कार, भन्नाट उखाणे ऐकून नवरे वर्गाची पडणार विकेट

VIDEO: महामिनिस्टरच्या नागपूर केंद्रावर वहिंनीचें चौकार षट्कार, भन्नाट उखाणे ऐकून नवरे वर्गाची पडणार विकेट

VIDEO: महामिनिस्टरच्या नागपूर केंद्रावर वहिंनीचें चौकार षट्कार, भन्नाट उखाणे ऐकून नवरे वर्गाची पडणार विकेट

मुंबई, नाशिक, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पनवेल, औरंगाबाद, अहमदनगर सारख्या केंद्रानंतर महामिनिस्टरची ( Mahaminister) टिम आता नागपूर केंद्रावर पोहोचली आहे. नागपूर केंद्रावर वहिनींने घेतलेले उखाणे सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

  मुंबई, 09 जून: झी मराठीवरील (Zee Marathi)  सर्वांचा लाडका महामिनिस्टर (Mahaminister Nagpur Center) )  हा कार्यक्रम नागपूर केंद्रावर जाऊन पोहोचला. वहिनींच्या उघाण्यांशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. महामिनिस्टर आणि उखाणा हे कायमचं समीकरण आहे. आजवर अनेक वहिनींनी अनेक उखाणे घेतले.  पण महामिनिस्टरच्या नागपूर केंद्रावर वहिनीं घेतलेल्या एकापेक्षा एक उखाण्यांना तोड नाही. उखाण्यांचे चौकार षट्कार मारत वहिनींनी प्रत्येकाला पोटधरुन हसायला भाग पाडलं आहे. वहिनींचे उखाणे ऐकून प्रेक्षकतर लोटपोट होणारच आहेत पण नवरे वर्गाची देखील चांगलीच विकेट उडणार आहे. मुंबई, नाशिक, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पनवेल, औरंगाबाद, अहमदनगर सारख्या केंद्रानंतर महामिनिस्टरची टिम आता नागपूर केंद्रावर पोहोचली आहे.  नागपूर केंद्राच्या पहिल्या राऊंडमध्ये वहिनी सहभागी झाल्या होत्या. त्यातील काही वहिनींनी आपली ओळख करुन देत भन्नाट उखाणे घेतले. एकाहून एक नागपूरी तडका असलेल्या उखाण्यांनी वहिनींनी संपूर्ण सभागृहाला हसवलं. वहिनींचे हटके उखाणे ऐकून निवेदन करणाऱ्या अभिनेता प्रणव रावराणे देखील अवाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रणवलाही हसू आवरत नव्हतं.
  झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नागपूरच्या वहिनींच्या भन्नाट उखाण्यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओखाली प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  एका युझरने म्हटलंय, 'चक्क नवरोबांची बेज्जती केलीय', तर अनेकांनी 'नागपूरकर रॉक्स', म्हणत कौतुक केलंय. होममिनिस्टर प्रमाणेच महामिनिस्टरला महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. आदेश बांदेकरांनीही (Aadesh Bandekar)  हा कार्यक्रम उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. महाराष्ट्राच्या घराघरात दररोज संध्याकाळी 6 वाजता होममिनिस्टर आणि आता महामिनिस्टर अशी हाक ऐकायला येते. घराघरात पहिल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमातील खरेपणा, सच्चेपणा. प्रत्येक स्त्रिच्या मनातील प्रश्नाला आदेश बांदेकर हात वाचा फोडतात. महाराष्ट्रातील जवळपास अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात महामिनिस्टरची टिम पोहोचली आहे. आता लवकरचं महाराष्ट्रातील एक वहिनी महाराष्ट्राचं महावस्त्र असलेल्या 11 लाखांच्या पैठणीवर आपण नाव कोरणार आहे.  11 लाखांची हिऱ्यांनी जडलेली महापैठणी कोणत्या वहिनी जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment, Nagpur, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या