Home /News /entertainment /

'किचन कल्लाकार'मध्ये स्टार किड्सचा राडा, ​प्रशांत दामलेंच्या खुर्चीचा लाडूने घेतला ताबा!

'किचन कल्लाकार'मध्ये स्टार किड्सचा राडा, ​प्रशांत दामलेंच्या खुर्चीचा लाडूने घेतला ताबा!

किचन कल्लाकारच्या (Kitchen Kallkar latest episode) मंचावर लवकरच स्टार किड्सची धमाल पाहायला मिळणार आहे. हे स्टार किड्य किचनमध्ये कसा राडा घालणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  मुंबई, 23 मार्च- झी मराठीवरील (zee marathi ) किचन कल्लाकार(Kitchen Kallkar latest episode) हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या मंचावर कधी कुणाचा बेत फसतो तर कुणाचा नंबर पटकावतो. पण सेलेब्सचा किचनमधील वावर यानिमित्ताने का होईना पाहायला मिळतो. केवळ कलाकारच नाही तर राजकीय मंडळींनी देखील या किचमध्ये सहभाग नोंदवला. आता या मंचावर लवकरच स्टार किड्सची धमाल पाहायला मिळणार आहे. हे स्टार किड्य किचनमध्ये कसा राडा घालणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याचा एक प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे. मागच्या काही दिवासांपासून संकर्षण कऱ्हाडे आणि प्रशांत दामले हे दोघेही सारखं काहीतरी होतंय ​​या​ नाटकानिमित्त व्यस्त आहेत. त्यामुळे काही दिवसांसाठी त्यांनी या शोमधून ब्रेक घेतलेला आहे. संकर्षण कऱ्हाडेच्या अनुपस्थितीत सूत्रसंचालनाची जबाबदारी श्रेया बुगडे सांभाळताना दिसते​.​ मात्र आता श्रेया ​बुगडेची जबाबदारी शौर्या वसईकर पेलताना दिसणार आहे. शिवाय​ किचन कल्लाकारच्या मंचावर ह्या आठवड्यात तुझ्यात जीव रंगला मालिकेतील लाडू देखील सहभागी होणार आहे. वाचा-कार्तिकसाठी दोन तरुणींनी एयरपोर्ट केलं असं काही,अभिनेत्याने मारला कपाळावर हात किचन कल्लाकारच्या मंचावर ह्या आठवड्यात लाडू म्हणजेच राजवीरसिंह रणजित गायकवाड ( rajveer gaikwad ) हा प्रशांत दामले महाराजांची खुर्ची सांभाळताना दिसणार आहे.​ यासोबतच​ स्नेहलता वसईकर हिची मुलगी शौर्या वसईकर ( shaurya vasaikar )सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे​.​ तर राजशेफच्या भूमिकेत राहुल देशपांडे यांची ​कन्या रेणुका देशपांडे (renuka deshpande ) पाहायला मिळणार आहे. हे बालकलाकार किचन कल्लाकारमध्ये कसा कल्ला करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
  झी मराठीनं या भागाचा नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये या बालकलाकारांनी कशाप्रकारे शोमध्ये मस्ती केली आहे हे तर दिसतच आहे. शिवाय प्रणव रावराणे आणि श्रेया बुगडे यांना देखील यावेळी बांधून ठेवण्यात आले आहे व तोंडाला चिकट टेप लावला आहे. एकूणच काय हे बच्चे कंपनी किचनमध्ये चांगलाच राडा घालणार असं दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या