Home /News /entertainment /

'किचन कल्लाकार'मध्ये शिजणार राजकीय खिचडी, रोहित पवार, प्रणिती शिंदे आणि पंकजा मुंडेंचा काय असणार बेत?

'किचन कल्लाकार'मध्ये शिजणार राजकीय खिचडी, रोहित पवार, प्रणिती शिंदे आणि पंकजा मुंडेंचा काय असणार बेत?

मराठीवर (Zee Marathi ) 15 डिसेंबरपासून किचन कल्लाकार ( Kitchen Kallakar) हा शो सुरू झाला आहे.आता किचन कल्लाकारमध्ये लवकरच राजकीय खिचडी सिजणार आहे.

  मुंबई, 2 जानेवारी - झी मराठीवर (Zee Marathi )  15 डिसेंबरपासून किचन कल्लाकार  ( Kitchen Kallakar)  हा शो सुरू झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देखील हजेरी लावली आहे. आता किचन कल्लाकारमध्ये लवकरच राजकीय खिचडी शिजणार आहे. झी मराठीवरील किचन कल्लाकर या शोमध्ये राजकाराणातील काही चेहेरे दिसणार आहेत. नुसते दिसणार नाहीत तर ते देखील किचनमध्ये कल्ला करताना दिसणार आहे. नेहमी राजकीय खिचडी शिजवणारे हे चेहरे किचनमध्ये काय आणि कसं मॅनेज करणार हे येणाऱ्या भागातच समजणार आहे. वाचा-Video:विकीला सोडण्यासाठी कतरिना पोहोचली एअरपोर्टवर, दिलं टाइट hug मधुरा रेसिपीच्या इन्स्टावर याचे काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे या देखील दिसणार आहे. त्यांच्यासोबत मधुरा रेसिपीच्या होस्ट मधुरा देखील दिसणार आहेत. त्यामुळे ही राजकीय मंडळी या किचनमध्ये काय शिजवणार, कोणता पदार्थ बनवणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
  मधुरा रेसिपीच्या इन्स्टावर याचे काही फोटो शेअर करत म्हटले आहे की, नवीन वर्षाच्या सर्वांना खमंग, खुसखुशीत नी गोडच गोड शुभेच्छा. नवीन वर्षात काहीतरी नवीन ! सर्व पक्षांनी एकत्र येऊन नि:पक्षपणे काय काय बनवले आणि धमाल केली बघायला विसरू नका किचन कल्लाकारमध्ये. दर बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 9.30 वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर झी मराठीवर. वाचा-'जय स्वामी समर्थ' मालिकेतील अभिनेत्रीचा या अभिनेत्यासोबत झाला साखरपुडा किचन कल्लाकारच्या सेटवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हजेरी लावत आहेत. या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले काम पाहत आहेत. तर शो होस्ट करण्याची जबाबदारी संकर्षण कऱ्हाडे करत आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Pankaja munde, Rohit pawar, Zee marathi serial

  पुढील बातम्या