• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कारभाऱ्यांच्या संसाराला लागणार शोना नावाचं ग्रहण; 'कारभारी लयभारी'मध्ये येणार नव वळण

कारभाऱ्यांच्या संसाराला लागणार शोना नावाचं ग्रहण; 'कारभारी लयभारी'मध्ये येणार नव वळण

मालिकेच्या सुरुवातीला दिसलेलं शोना (Shona) हे पात्र आता मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे. शोना आता दिल्लीत राजवीरला भेटायला गेली आहे.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै: झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मध्ये (Karbhari Laybhari) नवा ट्विस्ट येणार आहे. दरम्यान मालिकेतील विरू म्हणजेच राजवीर (Rajveer) आता मंत्री झाला आहे. तर तो आता दिल्लीत गेला आहे. सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण दिल्लीत तो एकटाच गेला आहे. तर पियु मात्र गावातच आहे. कठोर मेहनत करून अखेर विरू मंत्री झाला आहे. लोकांचा त्याला भरघोस पाठींबा मिळत आहे. लोकांची मदत करून त्याने साऱ्यांचं मन जिंकलं होतं. तर अखेर काकीला छेद देत तो राजकारणात सक्रिय झाला. तर त्याला मंत्रीपदही मिळालं. (Zee marathi serial)

  मेहुणी शमिता शेट्टीसोबतही राज कुंद्रा करणार होता चित्रपट; अभिनेत्रीने केला खळबळजनक दावा

  दरम्यान मालिकेच्या सुरुवातीला दिसलेलं शोना (Shona) हे पात्र आता मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे. शोना आता दिल्लीत राजवीरला भेटायला गेली आहे. ही गोष्ट राजवीर पियुला सांगतो पण हे ऐकून पियु भलत्याचं चिंतेत पडते. तर तिने विरूला आता शोनापासून दूर राहण्याचा सल्ला देते. व ती अजिबात चांगली बाई नसल्याचं सांगते. शिवाय आपला तुझ्यावर फार विश्वास असल्याचही म्हणते.
  View this post on Instagram

  A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

  त्यामुळे विरू आणि पियुच्या संसाराला आता शोनाचं ग्रहण लागणार आहे. दरम्यान मालिकेच्या सुरुवातीला प्रोमोत एका तमाशातील स्त्रिच्या आहारी विरू गेलेला असतो अंस दाखवण्यात आलं होतं. तेव्हा शोना विरू आणि पियुच्या संसारात कसं विष पेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं. (Karbhari Laybhari latest episode) याशिवाय मालिकेच्या सुरुवातीला शोना ही अंकुशराव पाटलांच्या (Ankushrao Patil) घरी म्हणजेच पियुच्या घरी राहत असते. तेव्हा पियु आणि शोनामध्ये वैमनस्य निर्माण झालेलं असतं. त्यामुळे शोना आता पिया बदला घेण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की.
  Published by:News Digital
  First published: