• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • डॉक्टरची तुरुंगातून झाली सुटका; 'देवमाणूस' मालिकेत नवं वळणं

डॉक्टरची तुरुंगातून झाली सुटका; 'देवमाणूस' मालिकेत नवं वळणं

‘देवमाणूस’मध्ये (Devmanus) अखेर आता डॉक्टरची (Doctor) तुरुंगातून सुटका झाली आहे.

 • Share this:
  मुंबई 14 जुलै : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ मध्ये (Devmanus) अखेर आता डॉक्टरची (Doctor) तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यामुळे मालिकेला नव वळण मिळताना दिसत आहे. याशिवाय एका नव्या पात्राच्या एन्ट्रीने आणखी ट्विस्ट वाढणार असल्याचंही दिसत आहे. दरम्यान कोर्टाने डॉक्टरला पुराव्याअभावी निर्दोष सोडलं आहे. यामुळे गावातील लोक फारच खूश झाले आहेत. व दिव्या (Divya Singh) आणि आर्याला हरवल्याचा आनंद डॉक्टर ला होत आहे. (Devmanus new twist)

  'पवित्र रिश्ता 2' मुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे; सुशांतच्या चाहत्यांनी केली बायकॉटची मागणी

  पण आता मालिकेत एक नवीन पात्र आलं आहे. व ही नवी बाई देवी सिंगसाठी (Devi Singh) धोकादायक ठरणार आहे. शिवाय ती देवी सिंगला चांगल्या प्रकारे ओळखत देखील आहे. त्यामुळे कोर्टातून निर्दोष सुटलेला देवी सिंग आता या नव्या बाईला पाहून पुरता घाबरला आहे.
  मागील भागात आपण पाहिलात देवी सिंग वर हल्ला झाला होता मात्र हॉस्पिटल मध्येही त्याचे नवनवीन प्लॅन्स सुरूच आहेच. डिम्पलच्या (Dimple) मदतीने तो नवीन षडयंत्र आखण्याचा प्रयत्न करत आहे. पण दिव्याने त्याला फाशी होण्यासाठी पुरते प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र डॉक्टरने त्याची सगळी शक्कल लढवून स्वतःची सुटका करून घेतली आहे.
  तेव्हा आता मालिकेत पुढे नक्की काय वळण येणार. व नवी बाई नक्की काय ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पोलिसांना या बाईची काही मदत होणार का की तिचाही देवी सिंग काटा काढणार हे येणाऱ्या भागांमध्येच स्पष्ट होईल.
  Published by:News Digital
  First published: