मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ACP दिव्याचा सिंघम अवतार; भर लग्नात ‘देवमाणसाला’ दिला बेदम चोप

ACP दिव्याचा सिंघम अवतार; भर लग्नात ‘देवमाणसाला’ दिला बेदम चोप

अखेर दिव्याने आवळल्या डॉक्टच्या मुस्क्या; भर लग्नात काढणार डॉक्टरची धिंड

अखेर दिव्याने आवळल्या डॉक्टच्या मुस्क्या; भर लग्नात काढणार डॉक्टरची धिंड

अखेर दिव्याने आवळल्या डॉक्टच्या मुस्क्या; भर लग्नात काढणार डॉक्टरची धिंड

  • Published by:  News Digital

मुंबई 29 मे : झी मराठी (Zee Marathi) वाहिनी वरील अतिशय चर्चेत राहणारी तसेच लोकप्रिय मालिका  ‘देवमाणूस’ (Devmanus) आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षक ज्या गोष्टीची अद्याप आतुरतेने वाट पाहत होते ती आता घडत आहे. अखेर पोलिसांना खरा गुन्हेगार कोण याची माहिती मिळाली आहे. आणि आता गुन्हेगाराच्या मुस्क्या आवळण्याचीही वेळ आली आहे.

दरम्यान मालिकेत डिम्पल (Dimple) आणि डॉक्टरच्या लग्नाची लगीनघाई पहायला मिळत आहे. हळद, मेहेंदी असे कार्यक्रम उरकले आहेत. व आता त्यांचं लग्न होत आहे. पण दिव्याला आपणच देवी सिंग आहेत याची माहिती मिळाल्याचं डॉक्टरला समजलं होतं. त्यामुळे डॉक्टरने दिव्याचा खूनही केला होता. पण आता दिव्याला काहीही झालं नसल्याचं समोर येत आहे.

PHOTOS: छोट्या पडद्याची बोल्ड क्वीन; पाहा निया शर्माच्या ग्लॅमरस अदा

दरम्यान मागील भागांत आपण पाहिलत डॉक्टर आणि डिम्पलच्या हळदीचा समारंभ असतो पण डॉक्टर अचानक गायब होतो तो दिव्याच्या घरी जाऊन तिला संपवून आलेला असतो. त्यामुळे डॉक्टर निश्चिंत झालेला असतो व आता आपल्याला कोणीही पकडू शकत नसल्याचं त्याला वाटलं होत. तर डिम्पल आणि डॉक्टर लग्नासाठी आता कोणतही विघ्न नसल्याचं म्हणतात. व लग्नाची तयारी करतात.

डॉक्टर आणि डिम्पल भर मंडपात लग्नाचे विधी पार पाडत असतानाच ऐनवेळी दिव्या तिथे पोहोचते. त्यामुळे दिव्याचा मृत्यु झाला नव्हता तर तिने डॉक्टरला चकवा दिला होता. ती अगदी राऊडी अवतारात तिथे पोहोचते व भर मांडवातून ती डॉक्टरला उचलते व त्याला बेदम चोप देते. त्यामुळे तिने डॉक्टरला बोलायला काहीच शिल्लक ठेवलं नाही. पण हा सगळा प्रकार पाहून घरातील तसेच गावातील सगळयांनाच मोठा धक्का बसला आहे.

दिव्याच्या या धडक कारवाईने आता डॉक्टर गजाआड जाणार पण अजूनही डॉक्टर काही कारस्थान तर रचणार नाही ना अशीही शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial