मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

देवमाणूस 2 : 'आतुरता फक्त आजीच्या शिव्यांची' कारण सुरू आजी Is Back, Video

देवमाणूस 2 : 'आतुरता फक्त आजीच्या शिव्यांची' कारण सुरू आजी Is Back, Video

देवमाणूस 2 मध्ये पाहायला मिळणार सुरू आजीच्या म्हणींचा धमाका. सुरू आजी आपल्या म्हणींने भल्या भल्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

देवमाणूस 2 मध्ये पाहायला मिळणार सुरू आजीच्या म्हणींचा धमाका. सुरू आजी आपल्या म्हणींने भल्या भल्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

देवमाणूस 2 मध्ये पाहायला मिळणार सुरू आजीच्या म्हणींचा धमाका. सुरू आजी आपल्या म्हणींने भल्या भल्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 8 डिसेंबर : झी मराठीवरील अनेक मालिका या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. यापैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या पहिल्या पर्वाने 15 ऑगस्टला प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील सर्व कलाकारांच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर अनेकजण फार आतुरतेने दुसऱ्या भाग कधी येणार याची वाट पाहात होते. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता अवघ्या पाच महिन्यात देवमाणूस 2   (devmanus 2) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या दुसऱ्या भागात सुरू आजीच्या ( suru aaji) म्हणींचा धमाका पाहायला मिळणार आहे.

देवमाणूस मालिकेतील डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा, डॉक्टर अजितकुमार ही पात्र प्रेक्षकांच्यात कमी काळात लोकप्रिय झाली. मात्र या सगळ्यांमध्ये सरु आजीच्या म्हणी भाव खावून गेल्या. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सुरू आजीच्या म्हणींची चर्चा होती. आता सुरू आजी परत आलीय. देवमाणूस मध्ये आपल्या म्हणींनी भल्या भल्यांना पाणी पाजण्यासाठी सुरू आजी तयार झाली आहे. झी मराठीने एक प्रोमो आऊट केला आहे. यामध्ये सुरू आजीचा एकदम रॉक अवतार पाहायला मिळत आहे.

वाचा: 'हास्यजत्रा'मधील कलाकारांसाठी आभाळ झालं ठेंगडं; अमिताभनंतर आता कोणी शुभेच्छा दिल्यात पाहा

यावेळी सुरू आजीची एंट्री देखील डॉक्टरच्या पुण्यस्मरणच पोस्टर फाडूनच झाली आहे. जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येतेय. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. काहींनी कमेंट करत याबद्दल उतुसकता दर्शवली आहे. एकाने म्हटलं आहे की, आतुरता फक्त सुरू आजीच्या शिव्यांची..तर दुसऱ्याने म्हटले आहे की, आज कान तृप्त झाले...आज्जी च्या शिव्या ऐकून...अशा अनेक मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नवी मालिका ‘देवमाणूस २’ महारंभ होतोय एक तासाच्या विशेष भागाने 19 डिसेंबरला. तर सोमवारी 20 डिसेंबरपासून रात्री 10 .30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान या मालिकेचा टीझरवरुन प्रेक्षकांमध्ये या नवीन भागाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या मालिकेच्या नवीन पर्वात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या झी मराठीवर सुरु असलेली ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials, Zee marathi serial