• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • देवमाणूस: चंदाच्या हाती लागणार वाड्यातील डेड बॉडीज; अखेर डॉक्टरचा होणार पर्दाफाश

देवमाणूस: चंदाच्या हाती लागणार वाड्यातील डेड बॉडीज; अखेर डॉक्टरचा होणार पर्दाफाश

डॉक्टरला पुन्हा जेरबंद करण्यासाठी पोलीस मेहनत घेताना दिसत आहेत. शिवाय यावेळी चंदा (Chanda) हे अस्त्र आता पोलिसांना मिळालं असल्याने लवकरच डॉक्टर जेलमध्ये जाण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  मुंबई 7 ऑगस्ट :  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय ‘देवमाणूस’ (Devmanus)  ही मालिका लवकरच वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. दुसरीकडे मालिका निरोप घेणार असल्याचं सांगितलं जातं आहे. तर डॉक्टरला पुन्हा जेरबंद करण्यासाठी पोलीस मेहनत घेताना दिसत आहेत. शिवाय यावेळी चंदा (Chanda) हे अस्त्र आता पोलिसांना मिळालं असल्याने लवकरच डॉक्टर जेलमध्ये जाण्याची शक्यता आहे. मालिकेत सध्या चंदाचा दरारा पाहायला मिळत आहे. लोकांना सहज फसवणाऱ्या आणि लुबाडणाऱ्या डॉक्टरवर म्हणजेच कंपाऊंडरवर तिचा चांगलाच वचक पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे डॉक्टर आता पुन्हा एकदा नव्या स्त्रीच्या मागे लागलेला पाहायला मिळतोय. तर तिलाही तो आपल्या जाळ्यात ओढून तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न तो करत आहे. पण चंदाने आपण असं काही ही होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.

  'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दिसणार नव्या भूमिकेत; या मालिकेत झळकणार हार्दिक जोशी

  View this post on Instagram

  A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

  दरम्यान चंदा विषयी सगळ काही आता पोलिसांना समजलं आहे. त्यामुळे तिने देखील इन्स्पेक्टर शिंदेला सगळं खरं खरं सांगितल आहे. तेव्हा आता चंदाच्या मदतीने ते डॉक्टर चा तपास करत आहेत. तर चंदा आता वाड्यातील सगळ्या डेड बॉडी शोधणार आहे. त्यामुळे आता डॉक्टरचा अंत जवळ आला आहे असं म्हणायला हरकत नाही.

  बॉयफ्रेंड आदर जैनसोबत तारा सुतारियाने केली B'day पार्टी; कपूर कुटुंबाची होणार सून

  याशिवाय झी मराठीवर नव्या 5 मालिका सुरू होणार आहेत. तर जुन्या मालिका बंद होणार आहेत. त्यात देवमाणूस ही मालिका देखील संपणार आहे. या जागी ‘ती परत आलिये’ (Ti Parat Aliye) ही नवी मालिका दिसणार आहे. 16 ऑगस्ट पासून ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे हाच मालिकेचा शेवटचा आठवडा असल्याचंही म्हटलं जात आहे.
  Published by:News Digital
  First published: