झायेद खान आता छोट्या पडद्यावर झळकणार !

झायेद खान आता छोट्या पडद्यावर झळकणार !

झायेद एका बिझनेस टायकूनच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • Share this:

10जुलै: 'मै हुँ ना'मध्ये 'लकी'च्या भूमिकेतून लोकांची मनं जिंकणारा झायेद खान रुपेरी पडद्यावर जास्त चालला नाही. 'शब्द'नंतर त्याचे जास्त सिनेमेही आले नाहीत. पण आता तो लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

सिद्धार्थ.पी.मल्होत्रा लवकरच एक मालिका घेऊन येत आहेत. या मालिकेत झायेद एका बिझनेस टायकूनच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका एक सस्पेन्स थ्रिलर असल्याचं म्हटलं जातंय. या कार्यक्रमात 'एक हसीना थी' फेम वत्सल शेठ आणि 'ड्रीम गर्ल'फेम निकिता दत्ताही प्रमुख भूमिकेत आहेत.

निर्मात्यांनी अजून तरी या 'शो'ची ऑफिशियल घोषणा केलेली नाही. झायेद खानला छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.

First published: July 10, 2017, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading