कतरीना कैफची डुप्लिकेट संबोधल्याने या अभिनेत्रीला दुःख; 11 वर्षांच्या संघर्षाची सांगितली कहाणी

कतरीनासारखं दिसण्यामुळे झरीन खानला (Zarine Khan) अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

कतरीनासारखं दिसण्यामुळे झरीन खानला (Zarine Khan) अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

  • Share this:
    मुंबई, 31 जानेवारी: हिंदी चित्रपट अभिनेत्री (Bollywood actress) झरीन खानने (Zarine khan) आपल्या पदार्पणातच सलमान खानसोबत (Salman Khan) काम केलं आहे. तिने बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर तिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तिला कतरीना कैफची (Katrina Kaif) जुळी अभिनेत्रीचा टॅगही बसला होता. त्यानंतर तिची अनेक वेळा कतरीनाशी तुलना केली जात होती. यावर आता झरीन खानने आपली चुप्पी तोडली आहे. कतरीनासारखं दिसण्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेक दिग्दर्शकांनी तिला डुप्लीकेट (Duplicate) असल्याचं कारण देवून काम नाकारलं असल्याची खंत झरीन खानने व्यक्त केली आहे. झरीन खानने नुकताच एका वृत माध्यमाला मुलाखत दिली होती. यामध्ये तिने कतरीनाशी केल्या जाणाऱ्या तुलनेबाबत मोकळेपणाने बातचित केली आहे. तिने नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'लोकं इंडस्ट्रीमध्ये आपली स्वतः ची ओळख बनवायला येतात. कोणाची जुळी बनण्यासाठी किंवा कोणाची सावली बनण्यासाठी नाही.' तिने पुढे म्हटलं की, 'मी गेल्या 11 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. पण आजही बहुतांशी लोक मला कतरीना कैफची जुळी असचं ओळखतात. त्यामुळे कोणताही दिग्दर्शक एखाद्या डुप्लिकेटसोबत काम करण्यास तयार नाही होतं. झरीन खानने तिच्या चेहऱ्याबद्दल सांगताना म्हणाली की, 'मला वाटतं माझा चेहरा वैश्विक आहे. खरंतर मी अनेक लोकांसारखी दिसते. काही लोकं मला पूजा भट्टची जुळी असल्याचं म्हणतात. तर काही जणांना मी प्रीती झिंटा वाटते. तर काहींना मी सनी लिओनी सारखी भासते. पण मला समजत नाही, लोकांना मी झरीन खान का नाही वाटत.' झरीन खानने सलमान खानच्या 'वीर' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणातच सलमान खान सोबत काम केल्याने अवघ्या काही दिवसांतच झरीन खूप प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिची अनेक अभिनेत्र्यांशी तुलना केली जात होती. एखाद्या अभिनेत्रीची जुळी असणं किती त्रासदायक असू शकतं, याचं दुःख झरीन खानने यावेळी बोलून दाखवलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: