अभिनेत्री झरीन खानचा 'हा' फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल

अभिनेत्री झरीन खानचा 'हा' फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल

अभिनेत्री झरीन खान चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत येत असते. पण यावेळी तिने इन्स्टाग्रमावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होतं असल्याने चांगलीच पसंती मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी : सलमान खानच्या 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणारी अभिनेत्री झरीन खान सध्या चर्चेत आली आहे. चित्रपटांमधल्या कामामुळे तिची फारशी चर्चा होत नाही मात्र सोशल मीडियावरच्या तिच्या 'बोल्ड' आणि 'हॉट' फोटोजमुळं ती कायम चर्चेत राहते.


सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह राहायला तिला फार आवडतं. नुकताच तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये ती योग करताना दिसत आहे. अभिनेत्री झरीन खान स्वत:ला फिट ठेवण्यासाठी स्वत:ची फार काळजी घेत असते. यावेळी ती योग करताना फारच फिट दिसत आहे.


झरीन खानचा हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतं आहे. तिच्या फॅन्सना तिचा हा लुक फारच आवडला असल्याने इन्स्टाग्रामवर या फोटोला पसंती मिळत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री झरीन खान 'उत्तान शिशोसन 'करत आहे.


बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याच्या आधी झरिन खान फार लठ्ठ होती. पण 'वीर' चित्रपटाच्या यशानंतर तिने सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी फार मेहनत घेतली आणि वजन कमी केलं.

काही दिवसांपूर्वी झरीन खान एका अपघातामुळे चर्चेत आली होती. गोव्यात तिच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी अभिनेत्री झरीन खानची गाडी असल्यामुळे हे प्रकरण बरच चर्चेत आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या