डोली लेके आना...! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला दबंग सलमानसोबत करायचंय लग्न

डोली लेके आना...! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला दबंग सलमानसोबत करायचंय लग्न

सलमानच्या आत्तापर्यंतच्या बॉलिवूड कारकिर्दित अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं मात्र यातलं कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. पण सर्वाधिक चर्चा होते ती भाईजानच्या लग्नाची. सलमानच्या आत्तापर्यंतच्या बॉलिवूड कारकिर्दित अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं मात्र यातलं कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे भाईजन अद्याप सिंगलच आहे. सध्या तो मॉडेल युलिया वंतूरसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत मात्र सलमाननं याबाब अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण नुकतंच सलमानच्या एक हिरोइननं त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

सलमाननं आतापर्यंत अनेक अभिनेत्रीना बॉलिवूडमध्ये करिअर उभं करण्यास मदत केली आहे. कतरिना नंतर सलमाननं झरीन खानला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमीच खास कनेक्शन राहिलं आहे. सलमाननं तिला तिच्या फिटनेस ट्रेनिंगमध्येही खूप मदत केली आहे. त्यावेळी सलमान आणि झरीनच्या अफेअरच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या मात्र नंतर त्या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं. पण आता नुकतंच एका मुलाखतीत सलमान खान सोबत लग्न करायची इच्छा बोलून दाखवून झरीन खाननं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

'बहोत हार्ड'ची हॉट Tik Tok स्टार आता करणार Bigg Boss 13 मध्ये एंट्री?

 

View this post on Instagram

 

That FriYay feeling ! #WeekendVibes #ZareenKhan HMU & - @rishabskhanna

A post shared by Zareen Khan ✨ (@zareenkhan) on

पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, तुझ्या अफेअरची चर्चा झाली तर ती काय असेल. त्यावर झरीननं खूपच मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, 'मला वाटतं की माझ्या अफेअरच्या अफवा उडाल्या तर त्यात माझं नाव सलमान खानशी जोडलं जावं. ही एक गंमतीशीर अफवा आहे जी मला स्वतःबद्दल ऐकायची आहे. ती अफवा अशी असेल की, सलमान माझ्याशी लग्न करणार आहे.'

Sacred Games 2 झाला ऑनलाइन लीक, निर्मात्यांना पायरसीचा फटका

झरीनचा चेहरा कतरिनाच्या चेहऱ्याशी खूपच मिळता-जुळता आहे. त्यामुळे कतरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमान झरीनला डेट करत असल्याच्या अफवा उठल्या होत्या. मात्र नंतर या दोघांमध्ये असं कोणतही नातं नसल्याचं समोर आलं. प्रोफशनल लाइफमध्ये सलमाननं तिला खूप मदत केली. तिनं सलमानसोबत 'वीर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

शिल्पा शेट्टीनं नाकारली 10 कोटींची जाहिरात; कारण वाचून म्हणाल, वाह!

 

View this post on Instagram

 

Happy 50th Birthday to my fav person @beingsalmankhan May God bless u always ✨✨✨ Lots of love ❤️ #aboutlastnight

A post shared by Zareen Khan ✨ (@zareenkhan) on

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या तो 'दबंग 3'च्या शूटमध्ये व्यस्त आहे. या सिनेमानंतर तो संजय लीला भन्साळी यांच्या 'इन्शाअल्लाह' या सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे. या सिनेमात सलमान सोबत आलिया भट स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सलमान आणि भन्साळी जवळपास 20 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. 'हम दिल दे चुके सनम' हा सलमान आणि संजय लीला भन्साळी यांचा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमान आणि भन्साळी यांच्यातही वाद झाले होते आणि त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं होतं.

अर्जुनच्या काकानं मलायका अरोराला केलं ट्रोल, वाचा फोटोवर केलेली 'ही' कमेंट

==================================================================

SPECIAL REPORT: 'माय नेम इज यश खान', मुस्लिम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

Published by: Megha Jethe
First published: August 18, 2019, 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading