S M L
Football World Cup 2018

अभिनेत्री झरीन खानची अज्ञात इसमांनी काढली छेड

प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी ती दिल्लीला गेली होती. त्याचदरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकारमुळे झरीन पुरती घाबरली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 19, 2017 04:31 PM IST

अभिनेत्री झरीन खानची अज्ञात इसमांनी काढली छेड

दिल्ली, 19 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानसोबत छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरंतर झरीन खान तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला सिनेमा 'अक्सर-2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी ती दिल्लीला गेली होती. त्याचदरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकारमुळे झरीन पुरती घाबरली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतल्या या कार्यक्रमादरम्यान 40 ते 50 लोकांनी झरीनला फोटो काढण्यासाठी घेरलं. या गर्दीत खूप धक्काबुक्की झाली. यातच काहींनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. जिथे ही घटना घडली तिथे सुरक्षा व्यवस्था कमी होती. त्यामुळे या गर्दीला थांबवणं कठीण झालं होतं. या छेडछाडीमुळे झरीन खूप घाबरली होती आणि म्हणून कार्यक्रम पूर्ण न करताच ती मुंबईसाठी रवाना झाली.

'अक्सर-2' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतं असल्याचं समजतंय. या सिनेमात झरीन खान, गौतम रोड आणि अभिनव शुक्ल प्रमुख भूमिकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close