बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्यानंतर झायरा वसीमची सोशल मीडियावर भावुक पोस्ट, म्हणाली...

बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्यानंतर झायरा वसीमची सोशल मीडियावर भावुक पोस्ट, म्हणाली...

काही दिवसांपूर्वी झायरा वसीमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक 6 पानी नोट लिहित तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्यापूर्वी झायरानं बॉलिवूडमधून एक्झिट घेत असल्याचा जाहीर केला होता. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा झायरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झायरानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यासोबत एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिनं एक इमारतीचा ब्लर फोटो शेअर केला आहे. या फोटो कॅप्शन देताना तिनं लिहिलं, ‘आपल्या आतील आग विझू देऊ नका. निरशेच्या दलदलीतही एका ज्योतीच्या आधारे चमकत राहा. जीवनातल्या एकटेपणातही तुमच्या आतील हिरोला मरू देऊ नका. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता.’ या पोस्ट मागे काय कथा आहे हे मात्र अद्याप समजलेलं नाही पण यावर सर्वांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत. पण सर्वाधिक लोक तिला पाठिंबा देताना दिसत आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको! बिपाशानं सुचवला पती करणच्या पत्नीचा ब्रायडल लुक

काही दिवसांपूर्वी झायरा वसीमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक 6 पानी नोट लिहित तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलं होतं. तिनं लिहिलं, ‘5 वर्षांपूर्वी माझा नवा प्रवास सुरू झाला, बॉलिवूडमध्ये मी प्रवेश केला. आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. या क्षेत्रानं मला खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळालं. पण त्यासोबतच मी शांतपणे किंवा अजाणतेपणे 'इमान'च्या मार्गावरून बाजूला गेले. माझ्या इमानात ढवळाढवळ करणाऱ्या वातावरणात मी सातत्यानं काम करत राहिले. माझ्या धर्माशी असलेल्या माझ्या नात्यालाच आव्हान निर्माण झालं. माझ्या धर्माची जी मूलभुत तत्व आहेत, त्याचं मला ज्ञान नव्हतं याची जाणीव झाली. आत्म्याच्या आवाजापासून दूर जाऊन घुसमट होते, या घुसमटीत जगणं असह्य आहे. महान आणि दैवी कुराणाच्या सान्निध्यात मला समाधान आणि शांती मिळते. मनाला खरोखर तेव्हा शांती मिळते जेव्हा त्याला निर्मात्याची ज्ञानप्राप्ती होते.’

वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियाची थट्टा, विवेक ओबेरॉय चाहत्यांच्या टार्गेटवर

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

लवकरच ती ‘द स्काय इडज पिंक’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिची मुख्य भूमिका असू तिच्या व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्याही या सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केलं असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

VIDEO : निया शर्माचा आगीशी खेळ, पाहा काय झाली अवस्था

=====================================================================

SPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी?

First published: July 13, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading