बॉलिवूडला रामराम ठोकणारी झायरा वसीम झाली ट्रोल, गायक अभिजीतने केले गंभीर आरोप Zaira Wasim

बॉलिवूडला रामराम ठोकणारी झायरा वसीम झाली ट्रोल, गायक अभिजीतने केले गंभीर आरोप Zaira Wasim

zaira wasim दंगल सिनेमाच्या वेळी झायराचा लुक समोर आल्यावर मुस्लीम कट्टरवाद्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

  • Share this:

मुंबई, 30 जून- आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीम नुकताच बॉलिवूडमधून एक्झिट घेत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. झायरानं नुकतंच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचं स्पष्टीकरणही दिलं आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

अनेकानी तिला या निर्णयावरून ट्रोल केलं तर काहींनी मात्र तिच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत त्यांनी झायराच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘झायराच्या निर्णयावर किंवा तिने केलेल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? तिला तिच्या इच्छेनुसार जगण्याचा पूर्ण हक्क आहे. तिने जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे ती आनंदी असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’

भारत- इंग्लंड सामन्यात ऋषी कपूर यांनी केले मजेशीर ट्वीट, पाकिस्तानी चाहते भडकले

19 हजारांमधून झाली होती निवड, आता Zaira Wasim ला झालंय तरी काय?

जनसत्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यने झायरा वसीम ड्रामा करत असल्याचं म्हटलं. तर ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी हा तिचा वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हणतं यावर अधिक भाष्य केलं नाही. तर बांग्लादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसीर यांनी मात्र झायराच्या या निर्णयाला मु्र्खपणा म्हणत तिचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. झायरानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन झायरानं हा निर्णय घेतला आहे का? अशी शंका उपस्थित केली आहे. झायरानं तिच्या या पोस्टमध्ये कुराणमधील वेगवेगळे संदर्भ दिले आहेत. या क्षेत्राचा रस्ता मला अल्लाह पासून दूर करत आहे असंही झायराचं म्हणणं आहे.

अभिनेत्री झायरा वसीमची बॉलिवूडमधून धक्कादायक एक्झिट

दंगल सिनेमाच्या वेळी झायराचा लुक समोर आल्यावर मुस्लीम कट्टरवाद्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व इस्लामच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यावेळी धमक्यांना न घाबरता काम करणाऱ्या झायरा वसिमनं आज मात्र धर्माचं कारण देत अभियनातूनच एक्झिट घेत असल्याचं जाहीर केल्यानं तिच्या या कृतीवर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याशिवाय झायरा सोशल मीडियावरील तिचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. लवकरच ती ‘द स्काय इडज पिंक’ या  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिची मुख्य भूमिका असू तिच्या व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्याही या सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केलं असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खानने तहानलेल्या माकडाला पाजलं पाणी, VIDEO VIRAL

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 08:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading