अभिनेत्री झायरा वसीमची बॉलिवूडमधून धक्कादायक एक्झिट

Zaira Wasim ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2019 01:16 PM IST

अभिनेत्री झायरा वसीमची बॉलिवूडमधून धक्कादायक एक्झिट

मुंबई, 30 जून : आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्यापूर्वी झायरानं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. झायरानं नुकतंच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचं स्पष्टीकरणही दिलं आहे.

VIDEO : सलग 36 सेकंद 'आझादी'वर बोलणाऱ्या या मुलीचा सलमानही झाला चाहता

झायरा वसीमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक 6 पानी नोट लिहित तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं लिहिलं, ‘5 वर्षांपूर्वी माझा नवा प्रवास सुरू झाला, बॉलिवूडमध्ये मी प्रवेश केला. आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. या क्षेत्रानं मला खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळालं. पण त्यासोबतच मी शांतपणे किंवा अजाणतेपणे 'इमान'च्या मार्गावरून बाजूला गेले. माझ्या इमानात ढवळाढवळ करणाऱ्या वातावरणात मी सातत्यानं काम करत राहिले. माझ्या धर्माशी असलेल्या माझ्या नात्यालाच आव्हान निर्माण झालं. माझ्या धर्माची जी मूलभुत तत्व आहेत, त्याचं मला ज्ञान नव्हतं याची जाणीव झाली. आत्म्याच्या आवाजापासून दूर जाऊन घुसमट होते, या घुसमटीत जगणं असह्य आहे. महान आणि दैवी कुराणाच्या सान्निध्यात मला समाधान आणि शांती मिळते. मनाला खरोखर तेव्हा शांती मिळते जेव्हा त्याला निर्मात्याची ज्ञानप्राप्ती होते.’

'तुला पाहते रे'चं शूटिंग संपलं आणि 'असा' झाला शेवट

Loading...

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

झायरानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन झायरानं हा निर्णय घेतला आहे का? अशी शंका उपस्थित केली आहे. झायरानं तिच्या या पोस्टमध्ये कुरानमधील वेगवेगळे संदर्भ दिले आहेत. या क्षेत्राचा रस्ता मला अल्लाह पासून दूर करत आहे असंही झायराचं म्हणणं आहे. दंगल सिनेमाच्या वेळी झायराचा लुक समोर आल्यावर मुस्लीम कट्टरवाद्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व इस्लामच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यावेळी धमक्यांना न घाबरता काम करणाऱ्या झायरा वसिमनं आज मात्र धर्माचं कारण देत अभियनातूनच एक्झिट घेत असल्याचं जाहीर केल्यानं तिच्या या कृतीवर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

VIDEO : सुनैना रोशन प्रकरणावर अखेर कंगनानं सोडलं मौन

याशिवाय झायरा सोशल मीडियावरील तिचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. लवकरच ती ‘द स्काय इडज पिंक’ या  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिची मुख्य भूमिका असू तिच्या व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्याही या सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केलं असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

==================================================================

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 01:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...