गौहर खान आणि झैद दरबारचं हटके डिजिटल वेडिंग कार्ड; VIDEO मधून उलगडली प्यारवाली लव्हस्टोरी

गौहर खान आणि झैद दरबारचं हटके डिजिटल वेडिंग कार्ड; VIDEO मधून उलगडली प्यारवाली लव्हस्टोरी

गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार (Zaid Darbar) यांचा लवकरच निकाह होणार आहे. त्यांनी वेडिंग इन्व्हिटेशनचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर: बिग बॉस (Big Boss 7) ची विजेती गौहर खान (Gauahar Khan) झैद दरबारशी (Zaid Darbar) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या 6 दिवस आधी या दोघांचं जरा हटके वेडिंग इन्व्हिटेशन समोर आलं आहे. 25 डिसेंबर रोजी त्यांचं लग्न होणार आहे. त्यांनी लग्नाचं आमंत्रण करणारा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

गौहर खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. याला 'जब वी मेट' असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमधून त्यांची मैत्री, एकमेकांना केलेलं प्रपोज आणि त्यानंतर त्यांच्यात खुललेलं प्रेम दाखवण्यात आलं आहे. 25 डिसेंबर 2020 रोजी निकाह होणार आहे असंही शेवटी यात दाखवलं आहे. या व्हिडीओला काही वेळातच 13 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत. ही डिजिटल इन्व्हिटेशनची कल्पना सध्या ट्रेंडमध्ये आली आहे. मुंबईल्या एका बड्या हॉटेलमध्ये झैद आणि गौहरचा निकाह होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

झैद दरबार हे नाव देखील सोशल मीडियावरील प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर असणारा झैदचे देखील लाखो फॉलोअर्स आहे. बिग बॉस 7 ची विजेती राहिलेली अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) म्यूझिक कंपोझर इस्माइल दरबार (Ismail Darbar) यांचा मुलगा आणि प्रसिद्ध टिकटॉकर झैद दरबारला (Zaid Darbar) डेट करण्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या होत्या. आता या कलाकारांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

झैदने सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. झैद गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. गौहर खान आणि अभिनेता कुशाल टंडन दीर्घकाळासाछी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं टिकलं नाही. कुशालदेखील बिग बॉस प्रतिस्पर्धी होता. शोमध्ये देखील त्यांची केमिस्ट्री दिसून यायची पण त्यांनी कालांतराने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 20, 2020, 9:11 AM IST

ताज्या बातम्या