झहीर खान-सागरिकाचं 27 नोव्हेंबरला शुभमंगल

झहीर मुस्लिम आहे आणि सागरिका हिंदू आहे म्हणून ते दोघेही कोर्टात लग्न करणार असल्याचं सांगितलं जातंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2017 06:50 PM IST

झहीर खान-सागरिकाचं 27 नोव्हेंबरला शुभमंगल

03 नोव्हेंबर : क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या प्रेमाच्या चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगल्याच रंगल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर ते दोघेही आता विवाहबंधनात अडकणार आहेत. 27 नोव्हेंबर ही लग्नाची तारीख ठरवली आहे. या दोघांच्या घरच्यांनी तर लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली आहे.

झहीर मुस्लिम आहे आणि सागरिका हिंदू आहे म्हणून ते दोघेही कोर्टात लग्न करणार असल्याचं सांगितलं जातंय. खरं तर या दोघांनी 24 एप्रिलला गुपचूप साखरपुडा केला होता आणि नंतर मुंबईला त्याची पार्टी केली होती. त्यांच्या या पार्टीला अनेक कलाकार उपस्थित होते.  साखरपुड्याचा फोटो झहीरनं ट्विटरवर शेअरही केला होता.

झहीर खानने एका मुलाखतीत त्या दोघांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला होता. तो असा की, 'जेव्हा सागरिकाच्या घरच्यांना समजलं की झहीरला सागरिकाशी लग्न करण्याची इच्छा आहे तेव्हा त्यांनी तातडीने 'चक दे इंडिया' सिनेमाची सीडी मागवली, तो सिनेमा पुन्हा पाहिला आणि मगच लग्नाला परवानगी दिली.'

सागरिकाच्या घरच्यांना क्रिकेट खूप आवडतं. त्यामुळे ते झहिरला खूप प्रेम करतात असंही तो म्हणाला. सध्या हे जोडपं लंडनमध्ये फिरायला गेलं आहे. सागरिका तिच्या इंस्टाग्रामनरून दोघांचे फोटो शेअर करत असते.

Loading...

Lucky to get some winter sun #londonlove ❤️

A post shared by Sagarika Ghatge (@sagarikaghatge) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...