Home /News /entertainment /

क्रिकेटच्या पिचवर युजवेंद्र अन् डान्स स्टेजवर धनश्रीचाच बोलबाला; पाहा भन्नाट VIDEO

क्रिकेटच्या पिचवर युजवेंद्र अन् डान्स स्टेजवर धनश्रीचाच बोलबाला; पाहा भन्नाट VIDEO

युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) होणाऱ्या पत्नीची स्वत:ची एक ओळख आहे. धनश्री वर्मा (Dhanashree Verma) एक उत्तम डान्सर असून तिच्या नव्या व्हिडीओला चाहत्यांची बरीच पसंती मिळाली आहे.

  मुंबई, 02 डिसेंबर: भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) ऑगस्ट महिन्यात त्याच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) तो लवकरच विवाह बंधनात बांधला जाणार आहे. धनश्री आणि युजवेंद्रच्या कपलवर अनेक मीम्सही बनली होती. धनश्री स्वत: उत्तम डान्सर आहे. तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. धनत्रीने मंगळवारी शेअर केलेल्या डान्स व्हिडीओलाही बरीच पसंती मिळत आहे. नेहा कक्करच्या (Neha Kakkar) शोना शोना (Shona Shona) गाण्यावर तिने डान्स केला आहे. काही तासातंच या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तिच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी छान कॉमेंट्सही केल्या आहेत.
  कोण आहे धनश्री वर्मा? धनश्री वर्मा एक यूट्यूबर असून डान्सर व कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा नावाची तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा बॉलिवूड गाण्यांवर डान्स करते. याशिवाय तिने हिपहॉपचं प्रशिक्षणही घेतलं आहे. तिच्या यूट्यूब चॅनलला 1.5 मिलिअन सबस्क्रायबर आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Cricket, Yuzvendra Chahal

  पुढील बातम्या