काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत चहलनं लवकरच लग्नासाठी कुर्ता शिवणार असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या या वक्तव्यावरून लवकरच त्याच्या घरी सनई-चौघडे वाजणार असल्याचं बोललं जात होतं. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटर आणि अभिनेत्री असं हे नातं आता काही नवीन नाही चहलच्या आधीही हरभजन सिंह, जहीर खान, युवराज सिंह, विराट कोहली अशा बऱ्याच क्रिकेटर्सनी अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे. त्यात आता युझवेंद्र चलहचीही भर पडणार असल्याचं बोललं जात आहे. टायगर श्रॉफला पोलिसांनी घातल्या बेड्या, वाचा नेमकं काय आहे कारणView this post on InstagramAppearances make impressions but it is the personality that makes an impact.
कोण आहे तनिष्का तनिष्का कपूर ही कन्नड अभिनेत्री असून तिचा जन्म मुंबईतला आहे. पण तिच्या जन्मानंतर तिचे आई-वडील कामानिमित्त कर्नाटकला शिफ्ट झाले. 16 वर्ष कर्नाटकमध्ये वास्तव्य केल्यानंतर तनिष्का अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी बंगळुरूला गेली. 2015 मध्ये तिनं ‘उप्पी 2’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमात तिनं सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. त्यानंतर तिनं ‘फर्स्ट रँक राजू’ सिनेमात काम केलं. तिचा हा सिनेमा गाजला आणि तनिष्का स्टार झाली. मात्र मागच्या 3 वर्षांपासून ती कोणत्याही सिनेमात दिसलेली नाही. पण आता चहलसोबत नाव जोडलं गेल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'मी प्रेग्नन्ट असेन तर...', पत्रकारच्या प्रश्नावर दीपिका पदुकोण भडकलीView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Yuzvendra Chahal