मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॅडमिंटनमध्ये सायनाला टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीचा युवराज सिंगही झाला चाहता

बॅडमिंटनमध्ये सायनाला टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीचा युवराज सिंगही झाला चाहता

या अभिनेत्रीच्या व्हिडीओवर भारतीय टीमचा ऑलराउंडर क्रिकेटर युवराज सिंहनं कमेंट केली आहे.

या अभिनेत्रीच्या व्हिडीओवर भारतीय टीमचा ऑलराउंडर क्रिकेटर युवराज सिंहनं कमेंट केली आहे.

या अभिनेत्रीच्या व्हिडीओवर भारतीय टीमचा ऑलराउंडर क्रिकेटर युवराज सिंहनं कमेंट केली आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 03 जानेवारी : सध्या बॉलिवूडमध्ये बायोकपिच्या ट्रेंडची चलती आहे. आतापर्यंत मिल्खा सिंह, संदीप सिंह, फोगाट भगिनी, महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर यांच्यावर बायोपिकची निर्मिती झाली आहे. येत्या काळात सायना नेहवाल, मिताली राज, कपिल देव यांच्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

एकीकडे या बायोपिकमध्ये काम करणारे कलाकार खेळ शिकत आहेत तर दुसरीकडे काही कलाकार असे आहेत. ज्यांना अभिनयासोबतच खेळातही रुची आहे. या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री सैयामी खेर. तिनं अनेकदा क्रिकेटप्रेम व्यक्त केलं आहे. पण तिला उत्तम क्रिकेट खेळता येतं हे तिच्या नुसकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून समोर आलं. फ्रंट फुट ड्राइव्ह खेळताना सैयामीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी जप्त केला पासपोर्ट

सैयामीचा शॉट पाहून युवराजही झाला चाहता

सैयामीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘नव्या वर्षात असं फ्रंट फुटवर जात आहे.’ सैयामीच्या या व्हिडीओवर भारतीय टीमचा ऑलराउंडर क्रिकेटर युवराज सिंहनं कमेंट केली आहे. युवराजनं ‘शानदार’ असं म्हणत तिच्या या शॉटचं कौतुक केलं आहे. सैयामीनं याआधीच तिचा बॉलिंग करतानाचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला होता.

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजला असताना सैयामी युनिव्हर्सिटी क्रिकेट टीममधून क्रिकेट खेळत होती. पण पुढे मॉडेलिंगमुळे तिला क्रिकेट सोडावं लागलं. एका मुलाखतीत सैयामीनं ती नेहमीच क्रिकेट मॅच पाहत असल्याचं सांगितलं होतं.

जान्हवी कपूरला आहे या गोष्टीचं 'व्यसन', 'धडक गर्ल' असा सांभळते Fitness

बॅडमिंटन स्टार सायनाला दिली होती टक्कर

सैयामीला फक्त क्रिकेटमध्येचं रुची नाही तर ती बॅडमिंटनही खेळते. तिनं बॅडमिंटनमध्ये ज्यूनिअर नॅशनल पर्यंत मजल मारली होती. ज्यात तिनं स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला टक्कर दिली होती आणि आजही ती आणि सायना एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. सैयामी जेव्हा मिर्जया सिनेमाचं शूट करत होती त्यावेळी माजी क्रिकेटर किरण मोरे त्यांच्या मुलीला भेटायला आले होते. ती या सिनेमाची दिग्दर्शक होती. त्यावेळी त्यांनी सैयामीच्या फिटनेसचं कौतुक करत अवघ्या दोन महिन्यांच्या ट्रेनिंगमध्ये ती क्रिकेट उत्तम प्रकारे खेळू शकेल असं म्हटलं होतं. याशिवाय सैयामी महाराष्ट्राच्या टीममधूनही क्रिकेट खेळली आहे.

कुशल पंजाबी आत्महत्या: वडिलांचा मोठा खुलासा, सांगितलं काय झालं होतं त्या रात्री

First published:

Tags: Bollywood, Yuvraj singh