पत्नीसोबत असतानाही एक्स गर्लफ्रेंडसोबत फोटो काढण्यात युवराज सिंग दंग

पत्नीसोबत असतानाही एक्स गर्लफ्रेंडसोबत फोटो काढण्यात युवराज सिंग दंग

Yuvraj Singh | Hazel Keech | Kim Sharma |जवळपास चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2007मध्ये युवराज आणि किम वेगळे झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये युवराजनं हेजल किचसोबत लग्नगाठ बांधली.

  • Share this:

मुंबई, 30 जून : भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने अवघ्या दोन आठवड्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर नुकतीच त्यानं जवळच्या मित्रमंडळींना पार्टी दिली. या पार्टीमध्ये युवराजच्या मित्रांसोबतच बॉलिवूड कलाकार आणि अंबानी कुटुंबीयही सहभागी झाले होते. मात्र या पार्टीमध्ये युवराजची एक्स गर्लफ्रेंड किम शर्माला पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. युवराज आणि किम यांचं बऱ्याच वर्षांपूर्वी ब्रेकअप झालं होतं. मात्र ते आजही चांगले मित्र आहेत. युवराजच्या निवृत्तीनंतर हेजल किचनं शेअर केलेल्या एका पोस्टवर किमनं ‘तुम्ही दोघंही असेच चमकत राहा’ अशी कमेंट केली होती. याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.

VIDEO : सनी लिओनीची टीव्ही बघायची पद्धत पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

नुकत्याच झालेल्या या पार्टीमध्ये हेजल आणि युवराजसोबत किमसुद्धा दिसली आणि विशेष म्हणजे युवराज आणि किमनं एकत्र फोटोसाठी पोजही दिली. युवराजच्या या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय किम आणि हेजलनंही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

किमनं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये युवराजसोबतचे काही फोटो शेअर केले. याशिवाय तिनं हेजलसोबतचा एक फोटो सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्यावर किमच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

लग्न जो-सोफीचं पण चर्चा मात्र प्रियांकाच्या देसी लुकची, पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

‍♀️‍ #aboutlastnight #twinningandwinning @hazelkeechofficial (scully)

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किम शर्मानं या पार्टीमध्ये चीत्ता प्रिंट ड्रेस घातला होता. तर हेजलनं ब्लॅक प्रिंटेड शर्ट आणि ब्लॅक पँट घातली होती. तसेच या सोबत तिनं लाइट मेकअप केला होता. किमच्या चाहत्यांनी तिचे युवराज सोबतचे फोटो आणि व्हिडिओ लाइक, शेअर करत आहेत. हजेलसोबत लग्न करण्याच्या काही वर्ष आधी युवराज आणि किम एकमेकांना डेट करत होते. जवळपास चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2007मध्ये ते वेगळे झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये युवराजनं हेजल किचसोबत लग्नगाठ बांधली.

VIDEO : सलग 36 सेकंद 'आझादी'वर बोलणाऱ्या या मुलीचा सलमानही झाला चाहता

===========================================================

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published: June 30, 2019, 4:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading