मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 24 तासांत निलेश साबळेंचा माफीनामा

संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 24 तासांत निलेश साबळेंचा माफीनामा

नुकत्याच प्रसारित झालेल्या 'चला हवा येऊ द्या'च्या एपिसोडमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला होता.

नुकत्याच प्रसारित झालेल्या 'चला हवा येऊ द्या'च्या एपिसोडमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला होता.

नुकत्याच प्रसारित झालेल्या 'चला हवा येऊ द्या'च्या एपिसोडमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला होता.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 14 मार्च : 'झी मराठी' या वाहिनीवर सुरू असलेला 'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रमक वादात सापडला होता. नुकत्याच प्रसारित झालेल्या या कार्यक्रमातील एका भागामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला होता. यावरूनच खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले होते. त्यानंतर आता कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे. 'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनीने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,' असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. 'त्यानं तर माझ्याही जाहिराती हिसकावल्या…’ कपिलचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आक्रमक भूमिकेनंतर निलेश साबळे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. ‘सादर करण्यात आलेल्या स्किटमधला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून…घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.’ असं निलेश साबळे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. ‘मी स्वतःसाठी कपडे घालते, इतरांसाठी नाही’ ट्रोलर्सना दिशा पाटनीचं सडेतोड उत्तर 'आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले होते. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,' अशा शब्दांमध्ये संभाजीराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी बॉलिवूडपासून राजकीय नेत्यांची मिमिक्री आणि सहज अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे हे अभिनयासह सूत्रसंचालनाचीही जबाबदारी पार पाडतात. आमिर आणि सलमान दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होते आणि...
First published:

पुढील बातम्या