पैशांमुळे अभिनेता अर्जुन रामपालच्या विरोधात केली तक्रार

पैशांमुळे अभिनेता अर्जुन रामपालच्या विरोधात केली तक्रार

अर्जुन रामपालने एका कंपनीचे कर्ज न फेडल्याप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. पण आता त्याच्याविषयी खळबळजनक माहिती समोर येत आहे. ज्यामुळे अर्जुनच्या चाहत्यांना नक्कीच विचार करायला भाग पाडणारी आहे. अर्जुन रामपालवर कर्ज न फेडल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन रामपालला गेल्या अनेक वर्षापासून फार चांगली कामं मिळाली नाही. गेल्या वर्षी आलेला त्याचा डॅडी सिनेमाही इतका चालला नाही. अर्जुन रामपालने एका कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर तक्रार दाखल केली आहे.

अर्जुन रामपालवर क्रिमिनल केस दाखल करण्यात आला आहे. एका रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार व्हायटी एंटरटेनमेंट (YT Entertainment ltd.) लिमिटेड कंपनीने अर्जुन रामपालच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

9 मे रोजी अर्जुन रामपालने 12 टक्के व्याजानुसार कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. अर्जुनने हे कर्ज 90 दिवसांच्या आत परत करण्याचं कंपनीला वचन दिलं होतं. कर्जाची रक्कम जवळपास एक कोटीपर्यंत आहे. यानंतर अर्जुनने कंपनीला एक चेकनं पेमेंट केलं होतं परंतु तो चेक बाऊन्स झाल्यानं अर्जुन कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला.

अर्जुन ने कर्ज घेतलेली कंपनी चित्रपटांचं फडिंगसुद्धा करते. या कंपनीने अर्जुन रामपालला फार कमी व्याजदरावर कर्ज दिलं होतं रिपोर्टनुसार कंपनीचे पैसे वसूल होत नाही तोपर्यंत कंपनी अर्जुन रामपालकडे पैशांची मागणी करत राहणार आहे.

कंपनीने अर्जुनला अनेक सवलती देऊनही तो या कर्जाचं पेमेंट करू शकला नाही. त्यामुळे आता त्याच्याविरोधात केपनीने पैसे परतफेड करण्यासाठी नेगोशिएबल इंस्टुमेंटल अॅक्ट 1881 च्यानुसार तक्रार दाखल केली आहे.

 

First published: December 22, 2018, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading