• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सिडनी ते छोटा मॉनिटर : हे 5 व्हिडिओ YouTube वर आहेत ट्रेंडिंग

सिडनी ते छोटा मॉनिटर : हे 5 व्हिडिओ YouTube वर आहेत ट्रेंडिंग

YouTube वर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या टॉप 5 मध्ये सिंबाची टीम कपिलच्या शोमध्ये काय धुमाकूळ घालते तो व्हिडिओ आहे, तसंच मराठीत अव्वल ठरलाय सूर नवा ध्यास नवाचा छोटा मॉनिटर! याशिवाय कोणते व्हिडिओ आलेत पहिल्या पाचांत... पाहा...

 • Share this:
  मुंबई, 8 जानेवारी : व्हिडीओ पाहण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या युट्यूबवर 2018 वर्ष संपताना वर्षभरातील ट्रेंडिंग व्हिडीओची लिस्ट दिली जाते. त्याप्रमाणे दररोजचे ट्रेंडिंग व्हिडिओसुद्धा युट्यूबवर दिसतात. आज ट्रेंडिंगमध्ये असलेल्या टॉप 5 व्हिडिओत सिंबाचे कलाकार कपिलच्या शोमध्ये आलेला व्हिडिओ टॉपला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यनंतर भारतातील खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाचा व्हिडिओ दोन नंबरवर आहे. विराट कोहलीचं अभिनंदन करायला त्याची बायको अनुष्का शर्मा थेट मैदानात आली आणि तिने मिठी मारली तोही व्हिडिओ व्हायरल झालाय. टॉप व्हिडिओच्या यादीत मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या सूर नवा ध्यास नवा, छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमुळे लोकप्रिय झालेल्या 'मॉनिटर'चा व्हिडिओही आहे. तसंच रणवीर सिंगचा आगामी सिनेमा गल्ली बॉयमधील 'असली हिपहॉप' साँग आणि सुशांतसिंह राजपूतच्या 'सोनचिडीया'चा ट्रेलरही ट्रेंडमध्ये आहे. युट्यूबवरील टॉप 5 व्हिडीओ : अनदेखा तडका : कपिलच्या शोमध्ये सिंबाची टीम भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर खेळाडूंचा जल्लोष, विरुष्काची गळाभेट रणवीर सिंगचा आगामी सिनेमा गल्ली बॉयमधील असली हिपहॉप साँग सुशांतसिंह राजपुतच्या सोनचिडियाचा ट्रेलर छोटे सूरवीरच्या सेटवर मॉनीटर धोंड
  First published: