मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

फेमस कॉमेडियन-युट्यूबर भुवन बामची होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये धमाकेदार एंट्री; Photo Viral

फेमस कॉमेडियन-युट्यूबर भुवन बामची होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये धमाकेदार एंट्री; Photo Viral

महाराष्ट्राची हास्यजत्रा ( maharashtrachi hasyajatra) हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 21 डिसेंबर- महाराष्ट्राची हास्यजत्रा ( maharashtrachi hasyajatra) हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाचे अनेक सेलिब्रिटीही चाहते आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे आणि त्यातील विनोदवीरांचे कौतुक केले होते.आता या या प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत येत्या आठवड्यात प्रिसद्ध युट्यूब स्टार भुवन बाम हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भागातील काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

युट्यूब स्टार भुवन बाम  (youtube star bhuvan bam)याचे जगभराच चाहते आहेत. आपल्या 'धिंडोरा' नावाच्या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी भुवन आणि महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये त्याच्यासोबत शोची होस्ट प्राजक्ता माळी व अनुप सोनी देखील दिसत आहे. प्रसाद, नम्रता आणि विशाखा या हास्यकलाकारांबरोबर भुवननी देखील सादरीकरण केलं आहे. ही सर्व धमाल प्रेक्षकांना गुरुवारी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

वाचा-19 व्या वर्षी साखरपुडा करणाऱ्या रश्मिका मंदनाचं 'या' कारणानं तुटलं होतं नातं

गानसम्राज्ञी लता मंगेशकर नेहमी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहतात. त्या या कार्यक्रमाच्या फार मोठ्या चाहत्या आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचे विनोद त्यांना प्रचंड आवडतात. याच निमित्ताने लता मंगेशकर यांनी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्यासाठी खास भेटवस्तू पाठवली होती.

तसेच या भेटवस्तूंवर लता मंगेशकर यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेशही लिहिला होता. लता मंगेशकर यांनी कशाप्रकारे कार्यक्रमाचे कौतुक केलं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहित अभिनेता समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांनी माहिती दिली होती.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials