• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • अभिनय क्षेत्रात पदरी अपयश पडत असताना YouTube ने दाखवला आशेचा किरण, आज कमावतोय कोट्यवधी

अभिनय क्षेत्रात पदरी अपयश पडत असताना YouTube ने दाखवला आशेचा किरण, आज कमावतोय कोट्यवधी

सध्या यु-ट्यूबवर विविध विषयांवरील अनेक चॅनेल्स आहेत. त्यात Baklol Video हे चॅनेल विशेष लोकप्रिय ठरलं हे. पंकज शर्मा नावाचा युवक हा चॅनेल चालवतो. या चॅनेलच्या माध्यमातून पंकज दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) हे जसं व्यक्त होण्याचं, माहिती देण्याचं, शेअरिंगचं माध्यम आहे, तसंच ते कमाईचं देखील (Social Media Earning) साधन बनलं आहे. इन्स्टाग्राम (Earn via Instagram), यू-ट्युबच्या (Earn through Youtube) माध्यमातून आज हजारो लोक चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. त्यात यु-ट्यूब चॅनेलला क्रिएटर्सला अधिक पसंती मिळत आहे. वेगळ्या धाटणीचे, मनोरंजक किंवा माहितीपर व्हिडीओ शेअर करून त्या माध्यमातून सबस्क्रायबर्सची संख्या वाढवत चांगली कमाई अनेक युवक करत आहेत. सध्या यु-ट्यूबवर विविध विषयांवरील अनेक चॅनेल्स आहेत. त्यात Baklol Video हे चॅनेल विशेष लोकप्रिय ठरलं हे. पंकज शर्मा नावाचा युवक हा चॅनेल चालवतो. या चॅनेलच्या माध्यमातून पंकज दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावत असल्याची माहिती समोर आली आहे. Baklol Video हे यु-ट्यूबवरील लोकप्रिय चॅनेल पाच वर्षांपूर्वी अभिनेता पंकज शर्मानं चॅनेल सुरू केलं. या चॅनेलनं 10.2 दशलक्ष सबस्क्रायबर्सचा (youtube subscribers of Baklol Video) टप्पा ओलांडला आहे. या चॅनेलसाठी पंकजला डायमंड बटण (YouTube Diamond Button) देखील यु-ट्यूबकडून प्रदान करण्यात आलं आहे. ज्या चॅनेलनं 10 दशलक्ष सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला आहे, त्यांना हे बटण प्रदान करण्यात येतं. वाचा-नियमित पेन्शन हवी असल्यास पूर्ण करा हे काम, 30 नोव्हेंबर आहे डेडलाइन पंकजची ही वाटचाल तशी खडतर होती. आज तो यशस्वी असला तरी कधीकाळी त्याला अपयशाचाही सामना करावा लागला होता. पंकजचं अभिनेता (Actor) होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यानं खूप मेहनत घेतली. अभिनयाशी निगडीत कामं मिळावीत यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले. परंतु, प्रत्येक ठिकाणी त्याला नकार मिळाला. एक वेळ अशी होती की सततच्या अपयशामुळं पंकज नाराज झाला होता. पंकज मूळचा दिल्लीचा. त्यानं गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून बीसीए आणि एमबीएची पदवी मिळवली आहे. त्यानंतर सिनेसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यात त्याला अपयश आले. या अपयशानं खचून न जाता त्याने यु-ट्यूब चॅनल (Start your YouTube Channel) सुरू करायचा निर्णय घेतला. 'शिक्षण पूर्ण झाल्यावर मी गुडगाव येथे नोकरी करत होतो. मला 15,000 रुपये पगार मिळत होता. परंतु, काही महिन्यात मी ही नोकरी सोडली आणि व्हिडीओ निर्मितीवर लक्ष केंद्रीत केलं,' असं पंकज शर्मानं सांगितलं. वाचा-वर्षा उसगांवकर धरणार ममता बॅनर्जींचा हात, गोव्यात करणार पक्षप्रवेश- सूत्र विशेष परिश्रम घेत पंकजनं तयार केलेलं युट्यूब व्हिडीओ अल्पावधीतच लोकप्रिय होऊ लागले. त्याने तयार केलेला 'देसी बच्चे व्हर्सेस अंग्रेजी मॅडम' हा व्हिडीओ तर तुफान लोकप्रिय झाला. या व्हिडीओला 78 दशलक्ष व्ह्युज मिळाले. 'यु-ट्यूबच्या माध्यमातून माझी पहिली कमाई 9200 रुपये होती`, असं पंकज आवर्जून नमूद करतो. यु-ट्यूब प्रमाणे बॅकलोल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही तुफान हिट ठरला आहे. 305 k फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरही (Facebook) बॅकलोल व्हिडीओचे 4.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नसलं तरी पंकजनं यु-ट्यूबच्या माध्यमातून चांगली लोकप्रियता आणि यश मिळवलं आहे.
First published: