VIDEO : 'गली बाॅय'च्या रॅपला बिग बींचं आव्हान, म्हणाले औकाद को बदल ले!

VIDEO : 'गली बाॅय'च्या रॅपला बिग बींचं आव्हान, म्हणाले औकाद को बदल ले!

रणवीर सिंगच्या रॅप साँगला भरपूर प्रसिद्धी मिळालीय. पण या रॅप साँगला मोठं आव्हान मिळालंय.

  • Share this:

मुंबई, 02 मार्च : सध्या बाॅक्स आॅफिसवर गली बाॅय सिनेमाची अक्षरश: धूम सुरू आहे. रणवीर सिंगच्या रॅप साँगला भरपूर प्रसिद्धी मिळालीय.  पण या रॅप साँगला मोठं आव्हान मिळालंय.

हे आव्हान दिलंय खुद्द बाॅलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी. अमिताभ आणि तापसी पन्नू यांच्या बदला सिनेमात बिग बींनी रॅप साँग गायलंय. सिनेमाचं नवं गाणं औकात को बदल दे नुकतंच रिलीज झालंय.

रणवीरच्या गली बाॅयमध्ये रॅप साँगचं यश पाहता बदलाच्या निर्मात्यांनी सिनेमात रॅप साँग अॅड केलंय. गाण्याचं शीर्षक औकात आहे. बिग बींनी या गाण्याला स्वत:चा आवाज दिलाय.थ्रिलर सिनेमाला शोभेल असं हे रॅप साँग आहे.

दिग्दर्शक सुजोय घोष म्हणाला, ' या रॅप साँगसाठी अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज फिट बसतो. गाण्यात बच्चन एकदम कूल दिसतात. याचं संगीत क्लिंटन सेरेजोनी केलंय. कोरिओग्राफीही त्यांनीच केलीय.' हा सिनेमा 8 मार्चला रिलीज होतोय.

‘पिंक’ सिनेमानंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आगामी बदला सिनेमात दोघं एकत्र काम करत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि तापसी एक प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहेत.

शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हटलं की, ‘आता वातावरण बदलल्यासारखं वाटत आहे.’ याआधी शाहरुखने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना टॅग करून ‘मी तुमचा ‘बदला’ घ्यायला येत आहे. तयार रहा.’

याला उत्तर देताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘अरे शाहरुख ‘बदला’ घेण्याची वेळ निघून गेली.. आता सगळ्यांना ‘बदला’ दाखवण्याची वेळ आली आहे.’ सोशल मीडियावर बॉलिवूडच्या बादशहा आणि महानायकाचं हे संभाषण साऱ्यांनाच आवडलं होतं.

...म्हणून हृतिक रोशन मुक्ता बर्वेला म्हणतोय 'स्माइल प्लीज'

First Published: Mar 2, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading