मुंबई 13 नोव्हेंबर : सोशल मीडियामुळे आता काहीच लपून राहात नाही. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि सोशल मीडिया असल्याने घेतलेले सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात आणि काही मिनिटांमध्येच ते व्हायरल होतात. अभिनेते आणि हिरोइन्सच्या बाबतीत त्यांचे चाहते हे अगदी उत्साही असतात. त्यामुळे ते जिथे दिसतील तिथे ते त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. अशातच अनेक मजेदार घटना घडतात. त्या मोबाईलमध्ये कैद होत असल्याने त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. बाहुबली फेम प्रभासची चाहती असलेली एक तरुणी त्याला भेटली आणि तिने जे काही केलं त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
क्रिकेटच्या एका प्रश्नामुळे अजित कुमारांनी गमावले 7 कोटी! बघा तुम्हाला येतं का?
प्रभास विमानतळावरून बाहेर येताना त्याची एक चाहती त्याला भेटते. ती फोटोची विनंती करते आणि प्रभासही त्या विनंतीला मान देत तिच्यासोबत फोटो काढतो. त्यावेळी झालेला आनंद तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसून येतो. आपल्या मनातली इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद तिला झाला होता. ती प्रभाससोबत फोटो काढते आणि जाताना लाडाने त्याच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करते. मात्र हे करताना तिचा गालाला हात जरा जोरात लागतो. त्यामुळे ते गालावर थप्पड मारल्यासारखं दिसतं.
त्यानंतर दुसरा चाहता येतो आणि फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी प्रभासला नेमकं काय झालं ते कळतच नाही. तो आपल्या गालावरून हात फिरवतो तेव्हा त्यालाही हसू आवरत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा