500 रेमडेसिवीर इंजेक्शन्स दान केल्यानंतर शाहरुख म्हणाला, मी अन् माझी टीम...

500 रेमडेसिवीर इंजेक्शन्स दान केल्यानंतर शाहरुख म्हणाला, मी अन् माझी टीम...

शाहरुख खान (Shah Rukh Khan) या आधीही कोरोना रुग्णांच्या पाठिशी उभा राहिला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: कोरोनावर (Corona) उपचार घेणं अनेक रुग्णांना कठीण जात आहे. अशा रुग्णांसाठी बॉलिवूडचा किंग खान धावून आला आहे. शाहरुख खानन्या (Shah Rukh Khan) फाऊंडेशनने 500  रेमडेसिवीर  (Remdesivir) इंजेक्शनचा  खर्च उचलला आहे. आरोग्य मंत्रालयाला त्याने ही मदत दिली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबत ट्विटवररुन माहिती दिली तसेच शाहरुख खानचे आभारही मानले आहेत.

शाहरुख म्हणाला, मदत करत राहणार

सत्येंद्र जैन यांचे आभार मानत शाहरुख खानने ट्वीट केलं, ‘सत्येंद्र जैनजी मीर फाऊंडेशनचं कौतुक केल्याबद्दल तुमचे आभार. आपण एकजुटीने काम करू तेव्हाच या संकाटाचा सामना आपल्याला करता येईल. मी आणि माझी टीम भविष्यातही आपल्या लोकांच्या मदतीसाठी कायम उभे राहू’

सत्येंद्र जैन यांनी काय ट्वीट केलं होतं?

सत्येंद्र जैन यांनी ट्वीट केलं होतं, ‘ 500  रेमडेसिवीर  इंजेक्शन दान केल्याबद्दल शाहरुख खान आणि मीर फाउंडेशनचे आम्ही आभारी आहोत. गरजेच्या वेळी आपल्याकडून मिळालेल्या मदतीबद्दल धन्यवाद.’ शाहरुख खानने यापूर्वीदेखील कोरोना रुग्णांना मदत केली आहे. त्याने त्याच्या एका ऑफिसची जागा क्वारंटाईन सेंटरसाठी दिली होती. तसंच पीपीई किट् देखील डोनेट केली होती.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 13, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या