मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shahrukh khan :बॉयकॉट 'पठाण' ची मागणी करणाऱ्याला साधूंना जीवे मारण्याची धमकी; काय आहे प्रकरण?

Shahrukh khan :बॉयकॉट 'पठाण' ची मागणी करणाऱ्याला साधूंना जीवे मारण्याची धमकी; काय आहे प्रकरण?

Shahrukh khan In Pathaan

Shahrukh khan In Pathaan

बॉलिवूडचे चित्रपट बॉयकॉट करण्याच्या लाटेत आता शाहरुख खानचा पठाण सुद्धा सापडणार असं दिसतंय. सध्या 'लाल सिंग चड्ढा' नंतर आता शाहरूखच्या 'पठाण' लाही बॉयकॉटची भीती सतावत आहे.

    मुंबई, 13 ऑगस्ट  : सध्या बॉलिवूडच्या  चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सोशल मीडियावर त्या चित्रपटाला बॉयकॉट  करण्याचा ट्रेंड जोर धरतो आहे. नुकताच अमीर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाला याचा सामना करावा लागला आहे. आमिरच्या या  चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच 'बॉयकॉट लाल सिंग चड्ढा' हा हॅशटॅग प्रचंड प्रमाणात ट्रेंड झाला. या ट्रेंडचा परिणाम लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर पाहायला मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होताना दिसतोय. अशातच शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाला देखील बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला  शाहरूख खान सध्या त्याच्या  'पठाण'  या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरूख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते  गेली चार वर्ष उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. आता येणाऱ्या वर्षात म्हणजेच जानेवारी 2023 रोजी पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण त्याआधी त्याला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रपट 'पठाण' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन कच्छ साधू समाजाच्या अध्यक्षांनी केले होते. पण त्यांना आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हेही वाचा - Brahmastra : ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर; फोटो तुफान व्हायरल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु बंधू साधू देवनाथ  यांनी आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' प्रमाणे शाहरुखच्या 'पठाण' या नवीन चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. पण त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला.साधू देवनाथ यांनी शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला बॉयकॉट करण्याबाबत सोशल मीडियावर एक  ट्विट केले होते. त्यानंतर त्यांना ट्विटरवर  सलीम अली नावाच्या व्यक्तीने एक फोटो पाठवत जीवे मारण्याची धमकी दिली. तो व्यक्ती शाहरुख खानच्या पीआर टीममधील आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.  ते  सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात लवकरच पोलिस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करणार आहेत. बॉलिवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याबाबत ते म्हणाले कि, '"मी कोणत्याही चित्रपटाच्या विरोधात नाही, परंतु भारतीय चाहत्यांच्या प्रेमामुळे मोठे होणाऱ्या परंतु नंतर भारतीयांनाच नावे ठेवणाऱ्या अभिनेत्यांच्या विरोधात मी आहे.'' शाहरुख खानच्या बिगबजेट 'पठाण' या चित्रपटामध्ये  त्याच्यासोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या  देखील प्रमुख भूमिका आहेत. तसेच अभिनेता सलमान खान हा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'पठाण' चा टिझर प्रदर्शित झाल्यापासून शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आता त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे.
    Published by:Nishigandha Kshirsagar
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या