• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Yodha: करण जोहरच्या पहिल्या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी; फर्स्ट LOOK OUT

Yodha: करण जोहरच्या पहिल्या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी; फर्स्ट LOOK OUT

करण जोहरच्या (Karan Johar) आगामी चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Mlhotra) नुकतीच लुक टेस्ट दिली होती. या लुक टेस्टनंतर करणने सिद्धार्थला फायनल केले आहे. भूमिका निश्चित झाल्यानंतर, सिद्धार्थ आणि करण जोहरने एक मोशन पोस्टर (Motion Poster) आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर-   करण जोहरच्या   (Karan Johar) आगामी चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने   (Sidharth Mlhotra)  नुकतीच लुक टेस्ट दिली होती. या लुक टेस्टनंतर करणने सिद्धार्थला फायनल केले आहे. भूमिका निश्चित झाल्यानंतर, सिद्धार्थ आणि करण जोहरने एक मोशन पोस्टर  (Motion Poster)  आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. करण आणि सिद्धार्थच्या या चित्रपटाचे नाव 'योद्धा' (Yodha)  आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कोण असेल, हे अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 11 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असेल. धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तयार होणारा हा पहिलाच अॅक्शन चित्रपट असेल.
  सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपटाचा मोशन पोस्ट शेअर केला आहे. हे आकाशातून खाली येणा-या विमानाने सुरू होते. या विमानात एक-दोनच लोक बसले आहेत. विमानाच्या मागील बाजूस सिद्धार्थ हातात बंदूक घेऊन सतर्क स्थितीत दिसतो. आणि कॅमेऱ्याचे लक्ष त्याच्यावर केंद्रित होते. शेवटी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली जाते. या मोशन पोस्टरसह, सिद्धार्थने लिहिले की, “वॉरियर्स सादर करत आहे. धर्मा प्रॉडक्शनचा हा पहिला अॅक्शन फ्रँचायझी चित्रपट आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या दोन प्रतिभावान व्यक्तींनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपटातील त्याचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. या दोन पोस्टरमध्ये त्याने दोन वेगवेगळे लूक शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये सिद्धार्थ एका व्यक्तीला बंदुकीने लक्ष्य करत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये तो खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी खुणा आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर एक विमान उडताना दिसत आहे. निर्मात्यांनी अद्याप त्याची कथा उघड केलेली नाही. परंतु मोशन पोस्टर पाहिल्यानंतर सिद्धार्थ आर्मी ऑफिसर किंवा एजंटची भूमिका करत असल्याचं दिसतंय. (हे वाचा:46 व्या वर्षी 'डिंपल गर्ल' बनली आई! प्रीति झिंटाने दिली GOOD NEWS ) पोस्टर शेअर करताना सिद्धार्थने लिहिले की, “मी माझा सीट बेल्ट बांधला आहे कारण ही एक उत्तम राइड असेल! सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित हॅशटॅग योद्धा 11 नोव्हेंबर 2022 रोजी तुमच्या स्क्रीनवर येत आहे. आमच्या फिमेल लीडची लवकरच घोषणा केली जाईल."18
  Published by:Aiman Desai
  First published: