मुंबई 5 ऑगस्ट : बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) नंतर चार्मिंग बॉय म्हणून प्रसिद्धीस आलेला अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thackrey) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका व्हिडिओ अल्बम मध्ये ती दिसणार आहे. नुकताच त्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. तर शिव सोबत मोमो म्हणजेच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार आहे. मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जग्गनाथ (Mira Jagganath).
शिव आणि मीराच्या या नव्या गाण्याचं नाव ‘शीलावती’ (Shilavati) असं आहे. शिव ची शीलावती असं असं म्हटलं आहे. गाण्यात मीराचा सुपर हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तर शिव नेहमीप्रमाणेच हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. पण दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते ही हैराण झाले आहेत. 6 ऑगस्ट ला हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान बिग बॉस मराठी नंतर शिव फारच चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्याने तो सीझन जिंकला देखील होता. त्यातील शिव आणि वीणा ही जोडी फारच हीट ठरली होती. त्याआधी शिव एम टीव्ही वरील रोडिझ या शोमध्ये दिसला होता. उत्तम डान्सर असणारा शिव त्यानंतर घराघरात ओळखला जाऊ लागला.
View this post on Instagram
अभिनेत्री मीरा जग्गनाथ सध्या झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत आहे. त्यातील तिच मोमो हे पत्र प्रेक्षकांना विशेष आवडल आहे. सहाय्यक पात्र असला तरी मीराने स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. मालिका लोकप्रिय होताना दिसत आहे. फिटनेस फ्रिक असणारी मीरा आता या नव्या अल्बम मधून तिचा हॉट अंदाज दाखवणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आता गाण्याची वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.