Home /News /entertainment /

आजही दिसते इतकीच Sweet; ओळखलंत का कोण आहे ही गोड मराठमोळी अभिनेत्री?

आजही दिसते इतकीच Sweet; ओळखलंत का कोण आहे ही गोड मराठमोळी अभिनेत्री?

हा गोड फोटो कोणत्या गोड अभिनेत्रीचा आहे सांगू शकाल का?

  मुंबई, 01 सप्टेंबर : आपण जसजसं मोठे होते, तसतसं आपल्या शरीरात बरेच बदल होतात (Childhood photo). काही जणांचा चेहराही इतका बदलतो की त्यांना फोटोवरून ओळखणंच मुश्किल होतं (Celebrity childhood photo). किंबहुना हे तेच आहेत, यावर विश्वास बसत नाही. तर काही जणांचा चेहरा अगदी जसाच्या तसा राहतो किंवा त्यांच्या चेहऱ्यात असं काही वेगळंपण असतं ज्यामुळे हा फोटो त्याच व्यक्तीचा आहे, हे खात्रीने सांगता येतं (Marathi actress childhood photo). आता या फोटोतली ही गोड चिमुकली पाहा. ही चिमुकली आजही तितकीच गोड आहे. या चिमुकलीच्या क्युटनेसवरून आणि तिच्या हास्यावरून तुम्ही तिला ओळखलं असेलच. नसेल ओळखलं तरी हरकत नाही. ही गोड चिमुकली म्हणजे तुमची लाडकी स्वीटू (Sweetu) आहे. हो येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेतील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटनकर (Anvita Phalatnkar).
  येऊ कशी तशी मी नांदायलाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर अन्विताचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अन्विता लहानपणी जितकी गोड दिसत होती, तितकीच ती आता तरुणपणातही तशीच गोड दिसते. लहान वयात असलेला क्युटनेस, निरागसपणा तिच्या चेहऱ्यावर अजूनही दिसून येतो. तिच्या वागण्यातही लहान मूल दिसून येतं. अन्विताचा हा फोटो पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. हा फोटो नेटिझन्सना खूप आवडला आहे. हे वाचा - अर्चना-मानवच्या 'पवित्र रिश्ता'चा ट्रेलर रिलीज; सुशांतचे चाहते झाले इमोशनल अन्विताला कॉलेज जीवनापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. अनेक नाटकांत तिने कामं केली होती. 2014 साली आलेल्या सुपरहीट टाईमपास चित्रपटात लहानशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण अन्विताने या संधीचं सोन करत लहाणशी भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याजोगी केली. चंदा हे पात्र तिने साकारलं होतं. नंतर ती गर्ल्स या चित्रपटातही दिसली. त्यातीलही तिची भूमिका हिट ठरली होती. तसेच छबीदार छबी हे गाणंही सुपरहिट ठरलं होत. अन्विताने त्यात तुफान डान्स केला होता. अन्विता सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठीवरील मालिकेत स्विटू हे पात्र साकारत आहे. अन्विताच्या या मालिकेने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवली. मालिकेतील ओम आणि स्वीटू ही जोडी सुपरहीट ठरत आहे. स्वीटू म्हणून अन्विता प्रत्येक चाहत्याच्या मनावर राज्य केलं आहे. लोक तिला अन्विता नव्हे तर स्वीट म्हणूनच ओळखतात. हे वाचा - 'आई कुठे..'फेम संजनाचा मराठमोळा साज; नऊवारीत दिसतेय एकदम झ्याक अन्विता उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र ती एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. अन्विताचे डान्स व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ती आपल्या सह कलाकारांसोबत तर कधी एकटी धम्माल डान्स करत असते.  मालिकेमध्ये साधी भोळी दिसणारी स्वीटू रियल लाईफमध्ये मात्र खूपच बिनधास्त आणि स्टाईलिश आहे.  अन्विता बऱ्याचवेळा आपल्या सेटवर ऑफस्क्रीन मस्ती करत असते.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials, Zee marathi serial

  पुढील बातम्या