Home /News /entertainment /

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका 'या' दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका 'या' दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक

आज मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अन्विता फलटणकर (Anvita Phalatnkar) अर्थातच स्वीटूने (Sweetu) एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  मुंबई, 17 फेब्रुवारी-   'येऊ कशी तशी मी नांदायला'  (Yeu Kashi Tashi Mi Nandayla)  ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळवलं आहे. मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पुढे असायची. परंतु आता ही मालिका निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. आज मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अभिनेत्री अन्विता फलटणकर   (Anvita Phalatnkar)  अर्थातच स्वीटूने   (Sweetu)  एक खास पोस्ट शेअर केली आहे. झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेने अल्पवधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मालिकेत येणाऱ्या रंजक ट्विस्ट अँड टर्न्समुळे प्रेक्षक अगदी खिळून होते. प्रेक्षकांना स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री फारच पसंत पडली होती. नाजूक अभिनेत्री आणि बॉडीबिल्डर अभिनेता या सर्व प्रकाराला फाटा देत. एक वजनदार अभिनेत्री आणि एक नाजूक आणि अगदी देखणा असा अभिनेता या मालिकेतून आपल्याला पाहायला भेटलं. मालिकेतील तोच तोचपणा बाजूला करून अगदी नवीन विषय असल्याने प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात पडले होते.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  परंतु गेल्या काही दिवसांपासून मालिकेत विविध बदल केले गेले आहेत. काही महिन्यांचा लीपसुद्धा घेण्यात आला होता. यांनतर मालिकेची कथा थोडी भरकटली होती. त्यामुळे या मालिकेची टीआरपीसुद्धा कमी आल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांनतर आता ही मालिका बंद होणार असल्याची माहिती आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिका आपला निरोप घेत असल्याची कुणकुण आहे परंतु आता स्वतः अन्विता म्हणजेच स्वीटूने हे स्पष्ट केलं आहे.
  स्वीटूची (अन्विता फलटणकर)पोस्ट- अभिनेत्री अन्विता फलटणकरने या मालिकेत स्वीटूची भूमिका साकारली होती. तर अभिनेता शाल्व किंजवडेकरने ओमची भूमिका साकारली होती. ओम आणि स्वीटूची जोडी आपली रजा घेणार असल्याने चाहते थोडेशे निराश आहेत. तर दुसरीकडे अन्वितानेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. अन्विताने आपले आणि ओमचे अर्थातच शाल्वचे दोन फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं आहे, 'जिथे दुसरा अध्याय संपतो..' स्वीटूची ही पोस्ट पाहून चाहते भावुक झाले आहेत. शिवाय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने कमेंट करत 'लव्ह यू' असं म्हटलं आहे.'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका येत्या १९ मार्च पासून आपला निरोप घेत आहे. आज मालिकेचा शेवटचा भाग शूट करण्यात आला. यावेळी सर्व कलाकार अतिशय भावुक झाल्याचं सांगितलं जात आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या