मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

''आता रडायचं नाही तर रडवायचं'' ; ओमच्या Bad Boy लुकवर नेटकऱ्यांच्या रावडी कमेंट

''आता रडायचं नाही तर रडवायचं'' ; ओमच्या Bad Boy लुकवर नेटकऱ्यांच्या रावडी कमेंट

मागच्या काही दिवसांपासून 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala)  ही मालिका सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मात्र आता ओमचा Bad Boy लुक समोर आला आहे. याचा मालिकेवर काय परिणाम होणार का ?

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 26 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. आता मालिकेत एक नवीन ट्वीस्ट आला आहे. ओमचा न्यू लुक नुकताच समोर आला आहे. गुणी ओम आता Bad Boy झाला आहे. त्च या नवा (Om Bad Boy Look ) लुक नेटकऱ्यांना मात्र रूचला आहे. त्याचा लुक जरी रुचला असला तरी नेटकऱ्यांनी या सगळ्याच खापर मालविका, मोहित आणि नलू मावशीवर फोडलं आहे.ओमच्या बॅड बॉय इमेजला या सर्वांना जबादार धरले आहे. नेटकरी यांच्यावर चांगलेच भडकले आहेत.

झी मराठीने नुकताच 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये ओम खानविलकरता नवा लुक तर दिसत आहेच मात्र तो आता पहिला ओम राहिलेला नाही हे सुद्ध निदर्शनास आले. आता ओम बॅड बॉय झाला आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या लुकचं जकौतुक केलं आहे. मात्र मालविका, मोहित तसंच नलू मावशीवर मात्र नेटकरी भडकले आहेत.

ओमचा हा न्यू लुक पाहून एक नेटकऱी म्हणतोय की, खूप रडलाय आता रडवायची वेळ आली, सगळ्यात पहिला त्या मोहितला सरळ कर नंतर मालविका. या दोघांना खूप त्रास दे, ज्यामुळे हे दोघ खरं सांगतिल. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, या सगळ्याला फक्त मालविका,मोहित आणि नलू मावशी जबाबदार आहे. तर काहींनी ओमचा हा न्यू रावडी  लुक पाहाण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

वाचा : 'Sukh Mhanje Nakki Kay Asta' मधील 'तो' अवघड सीन कसा शूट झाला त्याचा VIDEO पाहाच!

ओमचा नवीन लुक जरी समोर आला असला तरी मालिकेत लीप येणार अशी चर्चा होती..ती चिंता प्रेक्षकांना देखील पडली आहे. मात्र जुन्या ओमपेक्षा नवीन ओम .. ओमचा बदलेला हा अवतार प्रेक्षकांना चांगलाच अवडलेला दिसत आहे. मालिके मागच्या काही दिवसामुळे स्वीटू आणि मोहितच्या लग्नामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मालिका बंद करावी अशी मागणी होत होती. मात्र आता मालिकेत हा नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. नेटकऱ्यांना तरी हा नवा ट्वीस्ट रूचला आहे मात्र मालिकाच्या टीआरपीवर याचा कसा परिणाम होतो हे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा : Mann zaal Bajind : कृष्णाच्या परत येण्यामुळे राया -अंतराचं लग्न थांबणार का?

ओमचा नवा लुकमुळे येणाऱ्या काळात मालिकेत काय बदल घडून येणार आहेत का, तसेच मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करेल का, स्वीटू आणि ओम एकत्र येतील का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial