Home /News /entertainment /

Yeu Kashi Tashi Mi Nandayala मधून शकू मावशीची एक्झिट ; शुभांगी गोखलेंऐवजी या अभिनेत्रीची होणार एंट्री?

Yeu Kashi Tashi Mi Nandayala मधून शकू मावशीची एक्झिट ; शुभांगी गोखलेंऐवजी या अभिनेत्रीची होणार एंट्री?

'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या जागेवर सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील एक लोकप्रिय चेहरा दिसणार असल्याची माहिती समोर आले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 1 नोव्हेंबर : झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडते. यासोबतच या मालिकेतील इतर कलाकारांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. सध्या मालिका सोशल मीडियावर मालिकेतील ट्वीस्टमुळे ट्रोल होत आहे. अशातच आता या मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी मालिका सोडणार असल्याची  चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या जागेवर मात्र सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील एक लोकप्रिय चेहरा दिसणार असल्याची माहिती समोर आले आहे. झी मराठी या इन्स्टा पेजवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यांनी 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील शकू मावशी म्हणजे शुभांगी गोखले मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की या मालिकेत शकू मावशीची जागा कोण घेणार.
  लवकरच या मालिकेत शकू मावशीची भूमिका स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील अंजीची आई म्हणजे अभिनेत्री किशोरी अंबीये आहेत. सोशल मीडियावर देखील याची चर्चा रंगलेली आहे. नेटकऱ्यांनी देखील या भूमिकेला शुभांगी गोखलेचे योग्य असल्याचे म्हटलं आहे. मात्र यावर अधिकृतपणे शुभांगी गोखले असतील किंवा किशोरी अंबीये यांच्याकडून कोणतचं अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही. यासोबतच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही. वाचा : दिव्या भारतीच्या वडिलांचं निधन; साजिद नाडियाडवाला शेवटपर्यंत होता सोबत यासोबतच झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये शुभांगी गोखले दिसत नाहीत तर त्यांच्या लुकमध्ये किशोरी अंबीये  दिसत आहेत. तर याच व्हिडीओच्या सुरूवातीला शुभांगी गोखले यांच्यासोबतच मालिकेचे पोस्टर दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची देखील संभ्रम अवस्था झाली आहे.
  शुभांगी गोखले यांनी मालिका सोडल्यामुळे मालिकेवर काही परिणाम होणार का, तसेच त्या मालिका सोडणार याची फक्त चर्चाच आहे, असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. काहींनी त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटलं आहे कारण मालिका लवकरच बंद होणार असल्याचे देखील नेटकऱ्याने म्हटलं आहे. वाचा : सारा-जान्हवीची केदारनाथ तीर्थयात्रा सोशल मीडियावर हिट; फोटो व्हायरल त्यामुळे आता मालिकेत काय होणार याचा मालिकेच्या टीआरपीवर काय परिणाम होणार का हे देखील पाहावे लागेला. तसंच येणाऱ्या भागात देखील काय होणार खरंच एक्झीट घेणार का हे तेव्हाच समोर येईल.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या