मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत FINAL TWIST; अखेर स्वीटूसमोर येणार सत्य, मात्र ओमने घेतला 'हा' निर्णय

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत FINAL TWIST; अखेर स्वीटूसमोर येणार सत्य, मात्र ओमने घेतला 'हा' निर्णय

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत  ज्या क्षणाची सगळी वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे. मालिकेत आता फायनल ट्वीस्ट  (FINAL TWIST) पाहायला मिळाणार आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ज्या क्षणाची सगळी वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे. मालिकेत आता फायनल ट्वीस्ट (FINAL TWIST) पाहायला मिळाणार आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ज्या क्षणाची सगळी वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे. मालिकेत आता फायनल ट्वीस्ट (FINAL TWIST) पाहायला मिळाणार आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडते मात्र आवडली परंतु मध्येच मालिकेत एक असा ट्विस्ट (yeu kashi tashi mi nandayala latest episode )आला त्यामुळे सर्वजण मालिकेचा तिरस्कार करू लागले. आता मालिकेत ज्या क्षणाची सगळी वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे. मालिकेत आता फायनल ट्वीस्ट  (FINAL TWIST) पाहायला मिळाणार आहे आणि त्याचा प्रोमो नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यानंतर या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल झाली आणि अजूनही होत आहे. प्रेक्षक या लग्नामुळे नाराज झाले आहेत. त्यांना ओम आणि स्वीटू यांना एकत्र बघायचे आहे. लग्नानंतर स्वीटू मोहितसोबत ओमच्याच घरात राहत आहे. स्वीटूला हे लग्न मान्य नाही तरी देखील घरच्यांसाठी सर्व काही ठीक असल्याचे भासवत आहे. ओम लग्नाच्या दिवशी कोठे होता याचे खरे कारण स्वीटूला माहित नव्हते. मात्र आता लग्नाच्या दिवशी जे काही घडले त्याची माहिती स्वीटूला तिच्या वडिलांकडून समजली आहे. ओम तिच्यावर किती प्रेम करते हे तिला समजलं आहे. स्वीटूच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे. म्हणजे तिनं मोहितसोबतच नातं संपवल्याचं दिसत आहे. त्यामुळे सत्य समोर आल्यानंतर ती काय निर्णय घेणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

स्वीटूला ओमच सत्य समजलय खरं पण तिकडे ओम शहर सोडून कायमचा निघाला आहे. त्यामुळे आता सगळं समजल्यानंतर ओमला स्विटू थांबवण्यासाठी गेली आहे मात्र त्याआधीच ओम हे शहर निघून जाईल का या दोघांची भेट होईल का आणि हे दोघे पून्हा एकत्र येतील का ..याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रेक्षकांना या लव्हबर्डना एकत्र पाहायच आहे मात्र आता मालिकेत पुढचा भाग काय आणि कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांच्या प्रेमाचा शेवट कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा : Bigg Boss Marathi 3: “माझा बाकीच्यांवर अजिबात विश्वास नाहीये” ; स्नेहा वाघ -जयशी नक्की कुणाबद्दल बोलत आहे? 

यासोबतच मध्यंतरी ओमचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मालिका य़ा फायनल ट्वीस्टनंतर लीप घेणार की, स्वीटू आणि ओमच लग्न होणार या आणि अशा अनेक चर्चा आता सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्यामुळे मालिकेतील येणारा प्रत्येक भाग रंजक वाढविणार असणार आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, TV serials, Zee Marathi, Zee marathi serial