मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत आणखी एक ट्विस्ट; मालिका घेणार लीप, पाहा VIDEO

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत आणखी एक ट्विस्ट; मालिका घेणार लीप, पाहा VIDEO

झी मराठीने नुकताच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील फायनल ट्वीस्टचा  एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मालिकेने लीप (yeu kashi tashi mi nandayala taking leap) घेतल्याचे दिसत आहे.

झी मराठीने नुकताच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील फायनल ट्वीस्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मालिकेने लीप (yeu kashi tashi mi nandayala taking leap) घेतल्याचे दिसत आहे.

झी मराठीने नुकताच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील फायनल ट्वीस्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मालिकेने लीप (yeu kashi tashi mi nandayala taking leap) घेतल्याचे दिसत आहे.

मुंबई, 6 डिसेंबर : झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मालिका आता एक विशिष्ट वळणावर पोहचली आहे. स्वीटूला ओमच सत्य समजले आहे. तर स्वीटू मोहितपासून देखील वेगळी झाली आहे. आता या सगळ्या ट्वीस्टनंतर मालिकेत लीप घेणार अशी चर्चा रंगली होती. आता फायनली तसच होणार आहे. मालिका लवकरच (yeu kashi tashi mi nandayala taking leap)  लीप घेणार आहे आणि हा फायनल ट्वीस्ट (FINAL TWIST) असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

झी मराठीने नुकताच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील फायनल ट्वीस्टचा  एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मालिकेने लीप घेतल्याचे दिसत आहे. कारण ओम त्याचं गेलेल घर, प्रापर्टी परत मिळवली आहे. तो त्याच्या आईला सांगत आहे की आई मी लंडन ते इंडिया रस्ता पार केला मात्र स्वीटूच्या गावा पर्यंतचा रस्ता माझ्यासाठी कठिण असल्याचे ओम आईला सांगत आहे. त्यामुळे मालिकेतील हा लीप किती वर्षाचा आहे याबद्दल देखील येणाऱ्या भागात उलगडा होईल. तसेच स्वीटू काय करते. तिचे गाव कुठे आहे या सारखे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडत आहे. शिवाय आता तरी ओम आणि स्वीटू एकत्र येणार का याची देखील उत्सुकता आहे.

वाचा : कुसुम-अनुजच्या आयुष्यात आलेली एलिशा आहे तरी कोण?

स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यानंतर या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल झाली आणि अजूनही होत आहे. प्रेक्षक या लग्नामुळे नाराज झाले होते. त्यांना ओम आणि स्वीटू यांना एकत्र बघायचे आहे. लग्नाच्या दिवशी जे काही घडले त्याची माहिती स्वीटूला तिच्या वडिलांकडून समजली.

ओम तिच्यावर किती प्रेम करते हे तिला समजलं आहे. त्यानंतर ती मोहित पासू वेगळी झाली. यासोबतच ती डान्स क्लास घेताना दिसली. तर तिकडे मालविलामुळे ओमल त्याचं घर तसेच प्रापर्टी गमवावी लागली. यामुळे ओमचे घरचे रस्त्यावर आले. अशातच मालविकेचा आणि मोहितचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. त्यानंतर मालिकेत हा लीप आल्याचा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे हा नवीन टवीस्ट आणि लीप कसा आला याची देखील उत्सुकता आहे. शिवाय या लीपचा मालिकेच्या टीआरपीवर काय परिणार होणार का हे देखील येणाऱ्या काळात समोर येईल.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial